भारत पाकिस्तान तणावादरम्यान दिल्ली एअरपोर्टने रविवारी प्रवाशांसाठी एक प्रवासी नियमावली जारी केली आहे. विमानतळाकडून प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सद्यपरिस्थिती पाहता फ्लाइटच्या वेळांमध्ये बदल होऊ शकतो आणि सुरक्षा तपासणीत अधिक वेळ लागू शकतो. यासाठी प्रवाशांना वेळेच्या थोडं आधी विमानतळावर पोहोचावं लागेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एअरपोर्टने प्रवाशांना सांगितलं की, केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा आणि प्रवाशांशी संबंधित अपडेटवर लक्ष द्या. भारत आणि पाकिस्तानदरम्यान शनिवारी सायंकाळी 5 वाजता लागू केलेली शस्त्रबंदीचं पाकिस्तानने उल्लंघन केलं. त्यानंतर देशभरातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
प्रवाशांसाठी नवी नियमावली...
- तुमच्या संबंधित एअरलाइनच्या संपर्क माध्यमांद्वारे अपडेट राहा.
- केबिन आणि चेक-इन बॅगेजसाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करा.
- सुरक्षा तपासणीसाठी विलंब लागू शकतो, त्यासाठी विमानतळावर लवकर पोहोचा.
- प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी विमान कंपनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करा.
- एअरलाइन किंवा अधिकृत दिल्ली एअरपोर्टवरील वेबसाइटच्या माध्यमातून उड्डाणांची स्थिती तपासून पाहा
- प्रवाशांनी अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर अवलंबून राहावे, इतर कोणत्याही वेबसाइट पाहू नये.
भारताकडून 32 विमानतळं बंद...
भारताकडून 32 विमानतळं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक दिवशी 400 हून अधिक उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. विमानन नियामक डीजीसीएने सांगितलं की, ही बंदी 9 मेपासून 15 मेपर्यंत सकाळी 5.29 पर्यंत राहील. त्यामुळे प्रवाशांनी आपला प्रवास रिशेड्यूल करा आणि यासाठी संबंधित एअरलाइन्सशी संपर्क करा. सरकार आणि सुरक्षा एजन्सी भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीनुसार निर्णय घेईल.