भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताकडून 32 विमानतळं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक दिवशी 400 हून अधिक उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. विमानन नियामक डीजीसीएने सांगितलं की, ही बंदी 9 मेपासून 15 मेपर्यंत सकाळी 5.29 पर्यंत राहील. त्यामुळे प्रवाशांनी आपला प्रवास रिशेड्यूल करा आणि यासाठी संबंधित एअरलाइन्सशी संपर्क करा. सरकार आणि सुरक्षा एजन्सी भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीनुसार निर्णय घेईल.
कोणती विमानतळं बंद राहणार..
- श्रीनगर
- जम्मू
- लेह
- अमृतसर
- चंदीगड
- अंबाला
- लुधियाना
- जोधपूर
- बिकानेर
- जैसलमेर
- उत्तरलई
- राजकोट
- भूज
- जामनगर
- धर्मशाला
- बठिंडा
- पटियाला
- पठाणकोट
- शिमला
- किशनगढ
- हिंडन
- पोरबंदर
- मुंद्रा
- कांडला
- अधमपूर
- अवंतीपूरा
- हलवारा
- कांग्रा
- केशोड
- भुंतर
- नलिया
- सरसावा
- थोईसे
पाकिस्तानने शुक्रवारी सलग दुसऱ्या रात्री जम्मू काश्मीरपासून गुजरातपर्यंत 26 ठिकाणांवर ड्रोल करण्याचा प्रयत्न केला जो भारताने हाणून पाडला. पाकिस्तानकडून विमानतळ आणि महत्त्वपूर्व ठिकाणांवरील ड्रोन हल्ले भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले.अशा परिस्थितीत सुरक्षेच्या कारणास्तव भारतातील 32 हून जास्त विमानतळं 15 मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्ली विमानतळावरुन 138 उड्डाणे रद्द
पाक हल्ल्यानंतर दिल्ली विमानतळावर सुरक्षा वाढवली आहे. दिल्ली विमानतळावरुन 138 उड्डाणे रद्द करण्यात आली असून आज नागरी आणि आंतरराष्ट्रीयसह एकूण 138 विमान रद्द करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. दिल्ली विमानतळावर येणाऱ्या चार आंतरराष्ट्रीय विमानं रद्द करण्यात आली आहेत.