भारत पाकिस्तान तणावादरम्यान शनिवारी तिसऱ्यांदा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. रात्री साधारण 11 वाजता घेतलेल्या या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी महत्त्वाची माहिती दिली. भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीच्या घोषणेच्या काही तासात पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले आणि एलओसीवर गोळीबार केला जात असल्याची माहिती मिळाली. या पत्रकार परिषदेत विक्रम मिसरी म्हणाले की, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. सैन्याला कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे. पाकिस्तानकडून सामंजस्य तोडण्यात आला आहे. सैन्य या परिस्थितीवर ठेवून आले. सैन्याला कोणत्याही परिस्थितीत कडक पाऊले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रात्री 11 वाजता पत्रकार परिषदेत काय म्हणाले परराष्ट्र सचिव...
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यासाठी आज संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये झालेल्या कराराचे गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून घोर उल्लंघन केले जात आहे.
नक्की वाचा - भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली? पडद्याआड काय घडलं? वाचा Inside Story
भारतीय सैन्याकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. भारत सीमेवर सुरू असलेल्या अतिक्रमणाची संघर्ष करीत आहे. हे अतिक्रमण अत्यंत निषेधार्ह आहे आणि त्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे.