पाकिस्ताननं आज (गुरुवार, 8 मे) रात्री भारतीय सीमेवरील राज्यात अनेक भागात हल्ले केले आहेत. जम्मू ते गुजरातपर्यंत हे हल्ले करण्यात आले. हे हल्ले हमासच्या पद्धतीनं करण्यात आल्याची माहिती आहे. भारतीय सैन्यानं हे हल्ले निष्फळ केले आहेत. या सर्व पार्श्वभूमीर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्याच्या तिन्ही प्रमुखांची बैठक बोलावली आहे. तर भारत कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यास चोख उत्तर देण्यास समर्थ आहे, असं केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलीय.
पाकिस्तानचे F16 विमान पाडले
पाकिस्तानी हवाई दलाचे F-16 सुपरसोनिक लढाऊ विमान संध्याकाळी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणालीने पाडण्यात आले. अशी माहिती एनडीटीव्हीला सुत्रांच्या माध्यमातून मिळाली आहे. हे एफ-16 विमान पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळावरून उडाले होते. ते पाकिस्तानी हवाई दलाचे एक महत्त्वाचे हवाई केंद्र आहे. भारतीय एसएएम (Surface-to-air missile) ने हे लढाऊ विमान सरगोधा हवाई तळाजवळ पाडले, असे सूत्रांनी सांगितले आहे.
पाकिस्ताननं गुरुवारी रात्री जम्मू काश्मीर, पंजाब राजस्थानमध्ये ड्रोन हल्ला केला आहे. जम्मू काश्मीरमधील जम्मू आणि कुपवाडा तसंच राजस्थानमधील जैसलमेरमध्ये पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केला. पण, भारतीय सुरक्षा दलानं हा हल्ला निष्फळ ठरवला. या हल्ल्यानंतर जम्मू, कुपवाडा तसंच जैसलमेरमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आले आहे. पंजाबमधील पठाणकोट, गुरुदासपूर या शहरामध्ये ब्लॅक आऊट करण्यात आले आहेत.