India Pakistan Video Fact Check : पाकिस्तानचा रडीचा डाव, सोशल मीडियावर फेक बातम्यांचा सुळसुळाट

सध्या विविध पाकिस्तानी अकाऊंटवरुन चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या व्हायरल व्हिडिओवर विश्वास ठेवू नका.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यापासून पाकिस्तानकडून भारतावर हल्ले केले जात आहेत. भारताकडूनही या हल्ल्यांना जबरदस्त प्रत्युत्तर दिलं जात आहे. 8 मेच्या रात्रीही पाकिस्तानने जम्मू, सांबा, अखनूर, बारमेर, जैसलमेर, भूज, गुजरातमध्ये केलेला हल्ल्याचा प्रयत्न भारताने परतवून लावला. रात्रभर एलओसीवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान सोशल मीडियावर पाकिस्तानकडून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. पाकिस्तानी लष्कराने भारताचं S-400 उद्ध्वस्त केल्याच्या बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या बातम्यांना विश्वास ठेवू नका. मूळत: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका.   

सध्या भारत पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. त्यादरम्यान सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अनेक फेक व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. फेक व्हिडिओच्या माध्यमातून पाकिस्तानकडून चुकीचा प्रोपोगंडा चालवला जात आहे. त्यामुळे हे व्हिडिओ पाहताना किंवा शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासून पाहणं आवश्यक आहे. 


पाकिस्तानातील निलम-झेलम हायड्रो पॉवर प्रकल्पावर भारताकडून हल्ला करण्यात आल्याची चुकीची माहिती सोशल मीडियावर चालवली जात आहे. मात्र ही माहिती चुकीची आहे. भारताने पत्रकार परिषदेत सांगितल्यानुसार, त्यांनी केवळ दहशतवादी तळांवर लक्ष्य केलं होतं. 

Advertisement

पाकिस्तानी लष्कराने धर्मशालावर एअर स्ट्राइक केल्यानंतर १२ सैनिक शहीद झाल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशलवर व्हायरल होत आहेत. हा व्हिडिओ पाकिस्तानी अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. मात्र हा दावा चुकीचा आहे.