India Post: स्पीड पोस्ट महागले, 1 ऑक्टोबरपासून नवे दर! OTP शिवाय डिलिव्हरी नाही, लगेच तपासा किती लागतील पैसे

Speed Post Rates: भारतीय टपाल विभागाने (India Post) इनलँड स्पीड पोस्टसाठी 1 ऑक्टोबर पासून लागू होणाऱ्या नवीन दरांची घोषणा केली आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
Speed Post Rates: भारतीय टपाल खात्याने स्पीड पोस्ट सेवेत नवीन बदल जाहीर केले आहेत.
मुंबई:

Speed Post Rates: भारतीय टपाल विभागाने (India Post) इनलँड स्पीड पोस्टसाठी 1 ऑक्टोबर पासून लागू होणाऱ्या नवीन दरांची घोषणा केली आहे. त्यासोबतच सुधारित दरपत्रक (Revised Tariff) देखील जारी करण्यात आले आहे.

या नवीन दरपत्रकानुसार, इनलँड स्पीड पोस्ट (डॉक्युमेंट) लोकल एरियाच्या बाहेर, देशात कोठेही पाठवण्यासाठी 47 रुपये हा मूळ दर (Base-Price) असेल. हे दर 50 ग्रॅम पर्यंतच्या डॉक्युमेंट/पत्र/नोटीस यासाठी लागू आहेत. यानंतर अंतर वाढेल तसे दर देखील वाढत जातील. उदाहरणार्थ, मुंबईहून दिल्लीला (सुमारे 1400 किमी) 50 ग्रॅम पेक्षा जास्त आणि 250 ग्रॅम पेक्षा कमी वजनाचे कोणतेही डॉक्युमेंट किंवा पुस्तक वगैरे पाठवण्यासाठी 72 रुपये खर्च करावे लागतील.

भारतीय टपाल खात्याला आधुनिक बनवण्याच्या प्रयत्नांतर्गत सुरू करण्यात आलेली स्पीड पोस्ट सेवा जलद वितरण (Fast Delivery), कार्यक्षम आणि सुरक्षित टपाल सेवा सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

वितरणासाठी OTP आवश्यक

भारतीय टपाल खात्याने स्पीड पोस्ट सेवेत नवीन बदल जाहीर केले आहेत. यामध्ये ओटीपी-आधारित सुरक्षित वितरण (OTP-Based Secure Delivery), ऑनलाईन पेमेंट सुविधा, एसएमएस-आधारित वितरण सूचना (SMS-Based Delivery Notification), सोयीस्कर ऑनलाईन बुकिंग सेवा, रिअल टाइम वितरण अपडेट्स आणि युजर्ससाठी नोंदणीची (Registration) सोय यांचा समावेश आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेचे e-KYC करताना OTP येत नाही? ही सोपी पद्धत वापरा आणि लगेच समस्या सोडवा )
 

'या नवीन वैशिष्ट्यांचा उद्देश विश्वासार्हता, सुरक्षा आणि ग्राहकांची सोय वाढवणे हा आहे,' असे केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने (Central Communications Ministry) म्हटले आहे की, 

मंत्रालयाने एका अधिकृत निवेदनात सांगितले की, स्पीड पोस्ट ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत विकसित होत आहे. देशातील पसंतीची वितरण सेवा म्हणून आपले स्थान मजबूत करण्यासाठी, आता काही नवीन वैशिष्ट्यांसह ते अपग्रेड केले गेले आहे.

( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana e-KYC: एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! अर्ज भरताना घ्या 'ही' खबरदारी )
 

स्पीड पोस्ट (डॉक्युमेंट्स) च्या दरपत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. नवीन खालीलप्रमाणे आहेत

स्थानिक भागातील  स्पीड पोस्टचे दर

वजनाची मर्यादा                                             दर
50 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी                          19 रुपये
51 ग्रॅम ते 250 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी           24 रुपये
251 ग्रॅम ते 500 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी         28 रुपये

Advertisement

200 किलोमीटर पर्यंतच्या अंतरासाठी


वजनाची मर्यादा                                                दर
50 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी                            47 रुपये
51 ग्रॅम ते 250 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी             59 रुपये
251 ग्रॅम ते 500 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी            70 रुपये


201 ते 500 किलोमीटर पर्यंतच्या अंतरासाठी

वजनाची मर्यादा                                          दर
50 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी                       47 रुपये
51 ग्रॅम ते 250 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी        63 रुपये
251 ग्रॅम ते 500 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी       75 रुपये

Advertisement


501 ते 1000 किलोमीटर पर्यंतच्या अंतरासाठी

वजनाची मर्यादा                                                   दर
50 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी                            47 रुपये
51 ग्रॅम ते 250 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी               68 रुपये
251 ग्रॅम ते 500 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी             82 रुपये

1001 ते 2000 किलोमीटर पर्यंतच्या अंतरासाठी
वजनाची मर्यादा                                 दर
50 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी                47 रुपये
51 ग्रॅम ते 250 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी        72 रुपये
251 ग्रॅम ते 500 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी    86 रुपये


2000 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी नवीन दर


वजनाची मर्यादा                                           दर
50 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी                        47 रुपये
51 ग्रॅम ते 250 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी         77 रुपये
251 ग्रॅम ते 500 ग्रॅम पर्यंतच्या सामानासाठी        93 रुपये
 

काय म्हणाले केंद्रीय मंत्री?

केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये लिहिले, '1 ऑक्टोबर 2025 पासून, स्पीड पोस्टमध्ये ओटीपी-आधारित वितरण, पर्यायी नोंदणी (Optional Registration) आणि जीएसटी (GST) स्वतंत्रपणे दर्शवण्यासह पारदर्शक दर (Transparent Rates) असतील. प्रत्येक घरापर्यंत जलद आणि खात्रीपूर्वक वितरण करणारा इंडिया पोस्ट, 167 वर्षांहून जास्त वर्षांच्या समृद्ध परंपरेनं नागरिकांना पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे जोडत आहे. या प्रगतीचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे.'

Topics mentioned in this article