
Ladki Bahin Yojana E-KYC: राज्य सरकारने 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' (Ladki Bahin Yojana) ही योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरु केली. त्यानुसार लाभार्थी महिलांना मागील वर्षी दरमहिना 1500 रुपये मिळत होते. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशात या योजनेचा मोठा वाटा होता.
विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेत अनियमितता झाल्याचे प्रकार उघड झाले. ही अनियमितता दूर होऊन योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना वेळेवर आर्थिक लाभ मिळावा यासाठी e-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. यामुळे अनेक महिलांना अडचणी येत असून, ओटीपी (OTP) न येणे किंवा उशिरा येणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
तुम्हाला देखील ही अडचण येत असेल तर काय करावं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
e-KYC करताना येणाऱ्या समस्यांवर उपाय
ओटीपीची समस्या: जर आधार क्रमांकावर ओटीपी येत नसेल किंवा उशिरा येत असेल, तर अनेकदा इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या असू शकते.
अर्जाची स्थिती तपासणी: जर तुम्हाला योजनेचा कोणताही हप्ता मिळाला नसेल, तर सर्वात आधी तुमच्या अर्जाच्या मंजुरीची स्थिती तपासा.
बँक खाते तपासणी: तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले (लिंक) आहे का आणि आधारवरील तपशील अचूक आहेत का, याची खात्री करा.
प्रशासनाशी संपर्क: जर वरील उपायांनी समस्या सुटली नाही, तर त्वरित जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधा.
( नक्की वाचा : Pune Traffic: पुण्यात बैलपोळा मिरवणुकीमुळे 9 वर्षांच्या मुलाचा जीव टांगणीला; 'आई'ने मांडला थरारक अनुभव... )
e-KYC करण्याची प्रक्रिया
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी e-KYC प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
वेबसाइटला भेट द्या: सर्वप्रथम https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
e-KYC फॉर्म: त्यानंतर वेबसाइटवरील 'e-KYC' बॅनरवर क्लिक करा.
आधार क्रमांक आणि ओटीपी: तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड (Captcha Code) टाका. 'Send OTP' वर क्लिक केल्यावर तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून 'Submit' करा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world