अणू करारापेक्षा मोठा करार, अमेरिकेसोबतची ही भागीदारी ठरणार गेम चेंजर

भारतामध्येही आता सेमी कंडक्टरची निर्मिती होणार आहे. आतापर्यंत सेमी कंडक्टर आयात केले जात होते. या सेमी कंडक्टर प्रकल्पामध्ये दोन्ही देशांच्या सैन्यासाठीच्या हार्डवेअरसोबतच नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक्स वापरासाठीच्या चिपचे उत्पादन केले जाईल.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

भारतामध्ये राष्ट्रीय सुरक्षेसाठीच्या सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. यासाठी अमेरिकेचे सहकार्य लाभणार आहे. हा प्रकल्प भारतातीलच नाही तर राष्ट्रीय सुरक्षेसाठी जगातील पहिला 'बहु सामुग्री उत्पादन प्रकल्प' (Multi Material Manufacturing Plant) असणार आहे. हा प्रकल्प भारताप्रमाणेच अमेरिकेसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकल्पासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य करार झाला असून हा करार ऐतिहासिक असल्याचे मानले जात आहे. अमेरिकी सैन्याने, भारतासोबत उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी पहिल्यांदाच सहकार्य करार केला आहे. संपूर्ण देशात सेमी कंडक्टरला मोठी मागणी असून भारताच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये हा मैलाचा दगड मानला जात आहे. 

भारतात उभारला जाणारा हा  सेमीकंडक्टर प्रकल्पामध्ये दोन्ही देशांसाठी लष्करी हार्डवेअर तसेच महत्त्वाच्या दूरसंचार नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरण्यासाठी चिप्सची निर्मिती केली जाईल.  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांच्यात आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेमध्ये या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. मोदी-बायडेन यांच्यातील संयुक्त बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये या प्रकल्पासाठी दोन्ही देशांनी केलेली हातमिळवणी ही एक ऐतिहासिक घटना असल्याचे म्हटले आहे.  हा प्रकल्प भारताच्या सेमीकंडक्टर निर्मिती उद्दीष्टाला पूरक ठरणारा आहे.  भारत सेमी, थर्डटेक आणि यूएस स्पेस फोर्स यांच्यात या कराराअंतर्गत धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी करण्यात येणार आहे.  
 

Advertisement
Topics mentioned in this article