Coldest Wather in 110 years : यंदा 110 वर्षातील सर्वाधिक थंडी पडणार; पावसानंतर थंडीचाही अलर्ट

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रातून परतीचा प्रवास पूर्ण केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हवामानावर मोठा परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Winter Season in India : गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढला आहे. वाढलेल्या उकाड्यामुळे सारेच जण हैराण झाले आहेत. जेवढा धुवांधार पाऊस झेलला, त्याच तीव्रतेने ऑक्टोबर हिट झेलण्यासाठी तुम्ही मनाची तयारी केली असेल. पण जरा थांबा आता गरमीची नाही थेट थंडीची तयारी करा. कारण देशात यंदा सर्वाधिक थंडीचा सामना करावा लागणार असल्याची माहिती आहे.

देशात 110 वर्षातील सर्वाधिक थंडी पडणार (oldest weather in 110 years)

येत्या काही दिवसात भारतात थंडीचं प्रमाण वाढणार आहे. विशेषत: उत्तर भारतात हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि इतर डोंगराळ भागामध्ये तापमानात विशेष घट होईल. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांनाही नेहमीपेक्षा जास्त थंडीचा सामना करावा लागणार असल्याची माहिती आहे. हिमालयाचा 85 टक्के भाग बर्फाने व्यापला आहे. ज्यामुळे भारतात थंडीचं प्रमाण वाढणार आहे. साधारण डिसेंबर ते जानेवारी महिन्यात हिमालय बर्फाने व्यापला जातो. पण यंदा ऑक्टोबर महिन्यातच म्हणजे जवळपास दोन महिने आधीच ही प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या 110 वर्षात तिसऱ्यांदा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तर भारतात तापमान 3 ते 4 सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकतं. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील तापमान आताच 15 अंशावर आहे. येत्या काही दिवसात तापमानाचा पारा आणखी खाली घसरेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

महाराष्ट्रात कशी असेल स्थिती? (Cold in Maharashtra)

महाराष्ट्रात देखील थंडीचं प्रमाण वाढणार आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रातून परतीचा प्रवास पूर्ण केला आहे. काही भागात अवकाळी पावसाची शक्यता असली, तरीही थंडी लवकरच सुरू होणार आहे. ला निनाच्या प्रभावामुळे हवामानावर विपरीत परिणाम होताना दिसतय. थोडक्यात सांगायचं तर ला निना म्हणजे प्रशांत महासागरातील थंड पाण्याचा प्रभाव असतो. यामुळे समुद्रातील थंड पाणी पृष्ठभागावर येतं, ज्यामुळे भारतात जास्त पाऊस, हिमवृष्टी आणि थंडी वाढते. ला निनामुळे यंदाच्या पावसाचं वेळापत्रक पूर्णपणे बिघडलंच होतं. शिवाय देशभरात अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता. आता ला निनाच्या प्रभावामुळे हिमालयात वेळेआधीच हिमवृष्टी आणि थंड हवामान झालंय..यामुळे यंदाचा हिवाळा हुडहुडी भरवणारा ठरणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.