आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही..तिन्ही दलांचे जवान वेगळ्या पद्धतीने सॅल्यूट का करतात? लाखो लोकांना माहित नाही

परेड पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की,भूदल (Army),हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांचे सॅल्यूट करण्याचे प्रकार वेगळे का असतात? तिन्ही दलांच्या सॅल्यूट पद्धतीत थोडा फरक का असतो? जाणून घेऊयात यामागाची कारणे.. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Indian Army Salute Style
मुंबई:

Indian Defence Force Salute : देशात 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने कर्तव्यपथावर भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी ताकद आणि शौर्याचं प्रदर्शन केलं आणि त्यांच्या देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला.  ही परेड लोक फक्त शहरांमध्येच नाही, तर गावागावतही मनोभावे आणि सन्मानाने पाहतात.पण अशी परेड पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की,भूदल (Army),हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांचे सॅल्यूट करण्याचे प्रकार वेगळे का असतात? तिन्ही दलांच्या सॅल्यूट पद्धतीत थोडा फरक का असतो? जाणून घेऊयात यामागाची कारणे.. 

तिन्ही सैन्यदलांच्या सॅल्यूटमध्ये नेमका फरक काय?

भारतीय सैन्यदलांचे सॅल्यूट करण्याचे प्रकार वेगवेगळे असण्यामागे शेकडो वर्षांची परंपरा नाही,
तर ऐतिहासिक आणि धोरणात्मक कारणे दडलेली आहेत. तिन्ही सैन्यदल आर्मी,नेव्ही आणि एअरफोर्स सॅल्यूट कसे करतात आणि त्यांच्यात नेमके कोणते मोठे फरक आहेत? वाचा सविस्तर माहिती

नक्की वाचा >> पुणे महापालिकेला कधी मिळणार महापौर? 'या' तारखेला 165 नगरसेवकांची विशेष बैठक, कोण कोण आहे शर्यतीत?

इंडियन आर्मीचं सॅल्यूट

भारतीय लष्कराचे जवान पूर्ण पंजा समोर उघडा ठेवून सॅल्यूट करतात. यात बोटे आणि अंगठा एकमेकांना लागलेले असतात आणि मध्य बोट कपाळाला स्पर्श करतं. सॅल्यूट स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याप्रती
"पारदर्शकता, आदर आणि विश्वास" व्यक्त करणे, हे यामागचं कारण आहे. जवानाचा तळहात हे दर्शवतो की,त्याच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. तो पूर्णपणे निःशस्त्र आणि आदरभावाने आपल्या वरिष्ठांना सलाम करत आहे.ही पद्धत अनुशासन,निष्ठा आणि परस्पर विश्वासाचे प्रतीक मानली जाते.

भारतीय नौसेनेचं सॅल्यूट

नौसेनेमध्ये सॅल्यूट करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. नौसैनिक तळहात जमिनीकडे वाकवून सॅल्यूट करतात, ज्यामुळे हात जवळपास 90 अंशांचा कोन बनवतो. या पद्धतीत तळहात समोरून दिसत नाही.

Advertisement

नक्की वाचा >> अकोल्यात चुरशीची लढत, महापौर-उपमहापौर पदासाठी 6 उमेदवार रिंगणात, 'त्या' अपक्ष उमेदवारामुळे समीकरणं बदलली

काय आहेत यामागची कारणे

पूर्वीच्या काळात नौसैनिक जहाजांवर अवजड यंत्रसामग्री,ग्रीस आणि तेल यांच्यामध्ये काम करत असत. त्यामुळे काम करताना त्यांच्या हातावर मळ,ग्रीस आणि काळेपणा यायचा. यामुळे मळलेला किंवा तेलकट हात वरिष्ठांना दाखवून सॅल्यूट करणे असभ्य व अनादराचे मानलं जायचं.म्हणून हात खाली वाकवून सॅल्यूट करण्याची पद्धत वापरण्यात आली.  ही परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे आणि आजही भारतीय नौसेना त्याच पद्धतीचे पालन करते.