जाहिरात

अकोल्यात चुरशीची लढत, महापौर-उपमहापौर पदासाठी 6 उमेदवार रिंगणात, 'त्या' अपक्ष उमेदवारामुळे समीकरणं बदलली

अकोला महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक सध्या अत्यंत चुरशीची बनली असून सत्तासंघर्ष तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोण कोण निवडणुकीच्या रिंगणारत उतरलं आहे? वाचा सर्व माहिती..

अकोल्यात चुरशीची लढत, महापौर-उपमहापौर पदासाठी 6 उमेदवार रिंगणात, 'त्या' अपक्ष उमेदवारामुळे समीकरणं बदलली
Akola Municipal Corporation Mayor News Update

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola Municipal Corporation Mayor Update : अकोला महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक सध्या अत्यंत चुरशीची बनली असून सत्तासंघर्ष तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  भाजपकडून शहर सुधार आघाडी स्थापन करत महापौर पदासाठी शारदा खेडकर यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबत डमी उमेदवार म्हणून कल्पना गोटफोडे यांचा अर्ज सादर करण्यात आला आहे. उपमहापौर पदासाठी भाजपकडून अनिल गोगे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेनेच्या सुरेखा मंगेश काळे यांनी महापौर पदासाठी, तर काँग्रेसकडून आझाद खान अलीयार खान यांनी उपमहापौर पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये थेट लढत निर्माण झाली आहे. तसच उपमहापौरपदासाठी भाजपचे अमोल मोहोकार यांनीही अर्ज दाखल केला आहे. महापौर पदासाठी 3 उमेदवारांनी एकूण 5 अर्ज दाखल केले. तर उपमहापौर पदासाठी 4 उमेदवारांनी 5 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.

 अपक्ष उमेदवारामुळे राजकीय गणितच बदलली 

या निवडणुकीत भाजपचे माजी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत राजकीय समीकरणे बदलली आहेत.त्यांनी उपमहापौर पदासाठीही अर्ज दाखल केल्याने चुरस अधिक वाढली आहे. विशेष म्हणजे,उपमहापौर पदासाठी दाखल केलेल्या त्यांच्या अर्जाचे सूचक व अनुमोदक हे ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. यामुळे भाजपविरोधी आघाडीत रणनीती आखली जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सध्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीही 3 असे एकूण 6 उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे.

नक्की वाचा >>  Kalyan News : शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा हृदयविकाराने मृत्यू, पोलिसांच्या एका फोनमुळे..

अकोल्याच्या महापालिकेत 41 च्या बहुमतावर सर्वांचं लक्ष

अकोला महानगरपालिकेत बहुमतासाठी आवश्यक असलेला 41 नगरसेवकांचा जादुई आकडा कोणाच्या बाजूने झुकतो,याकडे संपूर्ण अकोल्याचे लक्ष लागले आहे. भाजपप्रणीत आघाडी आणि भाजपविरोधी पक्षांनी एकत्र बांधलेली एकजूट यांच्यात थेट सामना होत आहे.अपक्ष उमेदवाराची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता असून तो उबाठासोबत गेला तर काँग्रेस आपला उमेदवार माघार घेणार का की अपक्ष उमेदवारच शेवटच्या क्षणी माघार घेणार,याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. येत्या काही तासांत अकोला महापालिकेतील सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

नक्की वाचा >>  बर्फाच्या डोंगरावर एकट्या फिरणाऱ्या पेंग्विननं जगाला रडवलं! जाता जाता सर्वांनाच दिला मोलाचा संदेश

Listen to the latest songs, only on JioSaavn.com