LPG Tanker mv sunshine crosses hormuz: करोडो भारतीयांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणखी एक एलपीजी टँकर भारताच्या दिशेने येत आहे. 'एमव्ही सनशाईन' या एलपीजी टँकरने होर्मुझची सामुद्रधुनी पार केली असून तो आता दिमाखाने भारताच्या दिशेने येत आहे. भारतीय नौदल आणि इतर यंत्रणा त्याला संरक्षण देत आहेत. या भागातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेले हे १५ वे एलपीजी जहाज आहे. भारतीय नौदल सुरक्षा पुरवत आहे.
भारतीयांसाठी Good News, होर्मुझमधून आणखी एक टँकर रवाना
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, 'एमव्ही सनशाईन' या एलपीजी टँकरने बुधवारी रात्री होर्मुझची सामुद्रधुनी पार केली. पर्शियन आखातातून सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर तो भारताच्या दिशेने येत आहे. सूत्रांनुसार भारतीय नौदलासह अनेक यंत्रणा भारताच्या दिशेने जाणाऱ्या या एलपीजी जहाजाला सुरक्षा पुरवत आहेत. जहाजात किती एलपीजी गॅस आहे, याचा तपशील उघड करण्यात आलेला नाही.
'एमव्ही सनशाईन' हा एलपीजी टँकर पर्शियन आखातातून भारताच्या मार्गावर असून तो सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करत आहे. सूत्रांनुसार, जहाजाचा भारतापर्यंतचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नौदलासह अनेक यंत्रणा सतत देखरेख आणि सुरक्षा सहाय्य पुरवत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रादेशिक तणावाच्या काळात भारतासाठी सुरक्षितपणे नेण्यात येणारा हा १५ वा एलपीजी टँकर आहे. हे जहाज सध्या भारताच्या दिशेने जात असून त्याला सर्व आवश्यक सुरक्षा कवच पुरवले जात आहे.
होर्मुझमधील परिस्थितीवर इराणचे मत
प्रादेशिक परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना, इराणचे उप परराष्ट्र मंत्री, काझेम गरीबाबादी यांनी सांगितले की, एकदा शांतता प्रस्थापित झाल्यावर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती सुधारेल. त्यांनी अमेरिकेवर गंभीर राजनैतिक चर्चा न केल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, "जर या प्रदेशात शांतता प्रस्थापित झाली, तर होर्मुझमधील पारदर्शकता आणि सुरक्षा सुधारेल आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे पूर्णपणे पालन केले जाईल."
भारताच्या भूमिकेवर विश्वास व्यक्त करताना गरीबाबादी म्हणाले की, पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी भारताने उचललेल्या कोणत्याही पावलाचे स्वागत केले जाईल. तसेच त्यांनी भारताच्या "निष्पक्ष" धोरणाची प्रशंसा केली आणि सांगितले की भारत नेहमीच शांततेच्या बाजूने राहिला आहे. दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंधांचा उल्लेख करत, इराणने भारत आणि इराण यांना 'एकाच संस्कृतीने जोडलेले दोन देश' असे संबोधले आणि परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याच्या गरजेवर भर दिला.
Pune VIDEO: टायमर बॉम्बसदृश्य वस्तूमुळे पुण्यात खळबळ! आरोपीचा हादरवणारा CCTV समोर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world