Indian Navy: भारतीय नौदलाने MIGM स्वदेशी क्षेपणास्त्राचे केले यशस्वी परीक्षण

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय नौदलाने स्वदेशी बनावटीच्या मल्टी-इन्फ्लुएंस ग्राउंड माइन (MIGM) चं यशस्वी कॉम्बॅट फायरिंग परीक्षण (कमी स्फोटकांसह) केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

भारत आपल्या संरक्षण क्षमतांमध्ये सतत वाढ करत आहे. भारतीय नौसेनाही दिवसेंदिवस आपली ताकद वाढवतच आहे. सोमवारी भारताने संरक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी करत स्वदेशी मल्टी-इन्फ्लुएंस ग्राउंड माइन (MIGM) क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण केलं. या कामगिरीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय नौसेना (Indian Navy) यांचं अभिनंदन केलं आहे. यामुळे भारतीय नौदल अधिक प्रभावी बनवेल, असंही ते म्हणाले. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर केलेली ही चाचणी महत्वाची समजली जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय नौदलाने स्वदेशी बनावटीच्या मल्टी-इन्फ्लुएंस ग्राउंड माइन (MIGM) चं यशस्वी कॉम्बॅट फायरिंग परीक्षण (कमी स्फोटकांसह) केलं आहे. हे मिसाईल एक आधुनिक मिसाईल आहे.  पाण्याखाली ते मारा करण्यात सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र  नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा, विशाखापट्टणम यांनी DRDO च्या इतर प्रयोगशाळा, उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा पुणे आणि टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लेबोरेटरी चंदीगड यांच्या सहकार्याने हे विकसित केलं आहे.

ट्रेंडिंग बातमी - Rahul Gandhi meets Modi: पंतप्रधान कार्यालयात मोदी- राहुल गांधी यांची बैठक, चर्चा काय झाली?

MIGM आधुनिक स्टेल्थ युद्धनौका आणि पाणबुड्यांविरुद्ध भारतीय नौदलाच्या क्षमता वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे. याचे उत्पादन भारत डायनेमिक्स लिमिटेड, विशाखापट्टणम आणि अपोलो मायक्रोसिस्टम्स लिमिटेड हैदराबाद हे आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि DRDO चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत म्हणाले की, या चाचणीनंतर आता हे क्षेपणास्त्र भारतीय नौदलात सामील होण्यासाठी तयार आहे.