Petrol Diesel Quality: पेट्रोल-डीझेलच्या गुणवत्तेबाबत शंका असेल तर काय कराल? कशी आणि कुठे कराल तक्रार?

Petrol Diesel : इंधनाची उच्च गुणवत्ता बाजारात कायम राखण्यासाठी आपली यंत्रणा किती सतर्क आहे, याची आकडेवारीच इंडियन ऑईलने जाहीर केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डीझेलच्या गुणवत्तेबाबत विविध बातम्या आणि चिंता व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर, देशातील आघाडीची सरकारी तेल कंपनी 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन'ने अधिकृत स्पष्टीकरण जारी केले आहे. आपल्या पेट्रोल पंपांवर मिळणाऱ्या इंधनाची शुद्धता आणि गुणवत्ता हीच आपली सर्वात मोठी प्राथमिकता असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यासोबतच, पेट्रोल-डीझेलमध्ये भेसळीची शंका आल्यास ग्राहकांनी काय करावे, याबाबतही कंपनीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

अफवांवर विश्वास ठेवू नका, 'अशी' करा थेट तक्रार

इंडियन ऑईलने आपल्या करोडो ग्राहकांना आवाहन केले आहे की, त्यांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अपुऱ्या माहितीच्या किंवा खोट्या पोस्टला बळी पडू नये. जर कोणत्याही ग्राहकाला इंधनाच्या शुद्धतेबाबत शंका असेल, तर ते  ग्राहक थेट संबंधित पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली शंका दूर करू शकतात.  इंडियन ऑईलच्या अधिकृत कस्टमर केअर चॅनेल्सद्वारे आपली तक्रार नोंदवू शकतात. ग्राहकांकडून येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची अत्यंत वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी केली जाईल, असा विश्वास इंडियन ऑईलने दिला आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)

एका आठवड्यात 10 हजार छापे 

इंधनाची उच्च गुणवत्ता बाजारात कायम राखण्यासाठी आपली यंत्रणा किती सतर्क आहे, याची आकडेवारीच इंडियन ऑईलने जाहीर केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या विशेष पथकांद्वारे देशभरात दररोज वैज्ञानिक चाचण्या आणि नियमित तपासणी केली जाते.

केवळ गेल्या एका आठवड्यात देशभरातील पेट्रोल पंपांवर छापे टाकून सुमारे 10,000 निरीक्षणे करण्यात आली आहेत. इंधनाचे स्वतंत्रपणे निकष तपासण्यासाठी 8,500 पेक्षा जास्त क्वालिटी टेस्ट घेण्यात आल्या आहेत. या मोहिमेसाठी शेकडो विशेष तपासणी पथके थेट मैदानावर उतरवण्यात आली आहेत.

(नक्की वाचा-  Ranbir Kapoor Investment: रणबीर कपूर बनला पुणेकर! मुळशीतील 'या' गावात खरेदी केली तब्बल 25 एकर जमीन)

भेसळ आढळल्यास डीलर्सवर होणार थेट कारवाई

इंधनाच्या गुणवत्तेबाबत कंपनीचे धोरण अत्यंत कडक आहे. इंडियन ऑईलने स्पष्ट केले आहे की, इंधनाच्या दर्जाबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही आणि कंपनी या बाबतीत 'झिरो-टॉलरन्स' धोरण राबवते. तपासणीदरम्यान किंवा ग्राहकांच्या तक्रारीवरून जर कुठेही पेट्रोल-डीझेलमध्ये भेसळ, दूषितीकरण किंवा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले, तर संबंधित पेट्रोल पंप डीलरविरुद्ध तात्काळ आणि अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कंपनीने दिला आहे.
 


Topics mentioned in this article