Railway News: रेल्वेच्या डब्ब्यांना निळा, लाल अन् हिरवा रंगच का असतो? जाणून घ्या त्यामागचे खास 'सिक्रेट'

भारतीय रेल्वेच्या प्रत्येक रंगामागे एक खास 'सिक्रेट' दडलेलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • भारतीय रेल्वेतील डब्यांचे रंग प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी ठरवण्यात आले आहेत
  • निळा रंगाचा आयसीएफ डबा स्लीपर आणि जनरल श्रेणीत येणाऱ्या गाड्यांमध्ये वापरला जातो
  • लाल रंगाचे एलएचबी डबे राजधानी आणि शताब्दी सारख्या वेगवान गाड्यांसाठी वापरले जातात
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

तुम्ही कधी विचार केला आहे का की, काही ट्रेन निळ्या तर काही लाल रंगाच्या का असतात? भारतीय रेल्वेच्या प्रत्येक रंगामागे एक खास 'सिक्रेट' दडलेलं आहे. हे रंग प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी निश्चित करण्यात आले आहेत.
भारतीय रेल्वेने प्रवास करताना आपण अनेकदा वेगवेगळ्या रंगांचे डबे (Coaches) पाहतो. हे रंग केवळ सौंदर्यासाठी नसून, त्यामागे एक विशिष्ट तांत्रिक कारण आणि इतिहास दडलेला आहे. रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांना लांबूनच डब्याची श्रेणी ओळखता यावी, यासाठी ही रंगसंगती ठरवण्यात आली आहे.

नक्की वाचा - Hardik Pandya Video: हार्दिकचा कारनामा!, आधी हळू खेळला मग तुटून पडला, पुढच्या 6 चेंडूत शतक

निळा रंग (ICF Coaches): भारतीय रेल्वेमध्ये निळा रंग सर्वाधिक प्रचलित आहे. हे प्रामुख्याने स्लीपर आणि जनरल डब्यांसाठी वापरले जातात. या डब्यांना 'ICF' (Integral Coach Factory) डबे म्हटले जाते. हे डबे लोखंडापासून बनवलेले असतात आणि यांचा वेग ताशी 70 ते 140 किमी असतो.

लाल रंग (LHB Coaches): राजधानी किंवा शताब्दी सारख्या वेगवान गाड्यांना लाल रंगाचे डबे असतात. यांना 'LHB' (Linke Hofmann Busch) डबे म्हणतात. हे डबे स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असून अपघाताच्या वेळी एकमेकांवर आदळत नाहीत. यांचा वेग ताशी 160 ते 200 किमी पर्यंत असू शकतो.

हिरवा आणि इतर रंग: 'गरीब रथ' सारख्या गाड्यांसाठी प्रामुख्याने हिरवा रंग वापरला जातो, जो कमी दरातील एसी प्रवासाचे संकेत देतो. तसेच डब्यांवरील पिवळ्या पट्ट्यांचा अर्थ तो डबा अपंग किंवा मालवाहतुकीसाठी (Parcel Van) राखीव असल्याचे दर्शवतो. ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर असलेले 'X' चे चिन्ह रेल्वे पूर्ण असल्याचे दर्शवते. जर एखाद्या डब्यावर पिवळ्या रंगाच्या तिरप्या रेषा असतील, तर समजावे की तो डबा 'जनरल' श्रेणीचा आहे. रात्रीच्या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांना डबे ओळखता यावेत म्हणून ही विशिष्ट रंगरचना आणि चिन्हे वापरली जातात.

Advertisement

रंगांनुसार वर्गीकरण:

  • निळा रंग: याला आयसीएफ कोच म्हणतात. हे मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना जोडले जातात.
  • लाल रंग: एलएचबी कोच म्हणून ओळखले जाणारे हे डबे हायस्पीड गाड्यांसाठी (उदा. राजधानी) वापरले जातात.
  • हिरवा रंग: गरीब रथ एक्सप्रेसची ओळख या रंगाने होते.
  • मरून रंग: हा रंग आता ऐतिहासिक वारसा असलेल्या किंवा काही विशेष मार्गावरील गाड्यांसाठीच मर्यादित राहिला आहे.