Indian Railways Ticket Registration: रेल्वे प्रवाशांनी लक्ष द्या! आता 8 तासांपूर्वी तयार होणार आरक्षण यादी, तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्येही बदल

भारतीय रेल्वे तिकीट नोंदणी प्रणालीत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आता ट्रेन निघण्याच्या आठ तासांपूर्वीच रेल्वेची आरक्षण यादी तयार होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारतीय रेल्वे तिकीट नोंदणी प्रणालीत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आता ट्रेन निघण्याच्या आठ तासांपूर्वीच रेल्वेची आरक्षण यादी तयार होणार आहे. याआधी ही यादी ट्रेन रवाना होण्याच्या चार तासांपूर्वी तयार होत होती. नव्या नियमामुळे प्रवाशांना सोपं जाणार आहे. 8 तासांपूर्वीच प्रवाशांचं तिकीट निश्चित झालं की नाही हे लक्षात येईल. जर तिकीट कन्फर्म झालं नाही तर त्यांच्याकडे 8 तासांचा अवधी राहील, ज्यातून ते दुसरा पर्याय शोध शकतील. 

दुपारी 2 वाजेपूर्वी रवाना होणाऱ्या ट्रेनची आरक्षण यादी 9 वाजेपर्यंत...

नव्या नियमानुसार, दुपारी दोन वाजेपूर्वीपासून निघणाऱ्या ट्रेनची यादी आदल्या दिवशी रात्री 9 वाजेपासून तयार होईल. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना वेळेत माहिती मिळेल आणि ते दुसरा पर्याय शोधू शकतील. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच या बदलाची समीक्षा केली आणि मोठे निर्णय घेतलं. 

Advertisement

नक्की वाचा - Rule Change : 1 जुलैपासून देशात होणार मोठे बदल, स्वयंपाकघरापासून ते रेल्वेच्या प्रवासावर होईल परिणाम

प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस): तिकीट बुकिंग क्षमता प्रति मिनिट 1.5 लाख तिकिटांपर्यंत वाढवली जाईल (सध्या 32,000 तिकिटे/मिनिट). चौकशी क्षमता 10 पट वाढवून प्रति मिनिट 40 लाख प्रति मिनिट केली जाईल. 
नवी प्रमाणी बहुभाषिक आणि उपयुक्त - ज्यामध्ये सीट निवड आणि विशेष श्रेणी (अपंग, विद्यार्थी, रुग्ण) यांच्या सुविधा देखील असतील.

1 जुलैपासून तत्काळ तिकिटांच्या बुकिंगमध्ये मोठा बदल...

1 जुलै 2025 पासून तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल केला जाणार आहे. 1 जुलैपासून केवळ तत्काळ तिकीटं प्रमाणीकृत वापरकर्त्यांद्वारेच बुक केली जाऊ शकतात. जुलै 2025 च्या अखेरीस ओटीपी आधारित प्रमाणीकरण अनिवार्य असेल.

प्रमाणीकरण हे आधार किंवा इतर सरकारी आयडीद्वारे केले जाईल (डिजिलॉकरमध्ये उपलब्ध). अशा परिस्थितीत, खाजगी एजंटना तिकिटं बुक करण्यात अडचणी येतील.