भारतात दररोज करोडो लोक ट्रेनने प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रवाशांसाठी ट्रेन तिकीट बुकिंग आणि कन्फर्म सीट मिळणे ही सर्वात मोठी समस्या आहे. अनेकदा असे होते की, एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी कुठेतरी जायचे असते, पण ट्रेनचे तिकीट मिळतच नाही. ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळणे लोकांसाठी एक मोठे आव्हान आहे. जनरल आणि तत्काल कोट्यातूनही तिकीट मिळालं नाही तर प्रवास शक्य होणार नाही हे सर्वच जण समजतात. जर नॉर्मल बुकिंग फुल झाले आणि तत्काल तिकीटही हातून निसटले तर आता काय करावे? हे बहुतेक लोकांना माहित नसते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ट्रेनचा चार्ट बनल्यानंतर कन्फर्म सीट मिळू शकते का?
तुम्हाला माहीत आहे का की, ट्रेनचा चार्ट बनल्यानंतरही कन्फर्म सीट मिळू शकते? होय, रेल्वेची करंट तिकीट बुकिंग सेवा तुमच्यासाठी शेवटच्या क्षणीही प्रवासाचा मार्ग खुला करू शकते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे खूप कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. या सोप्या ट्रिकने तुम्ही चालत्या ट्रेनमध्येही सीट मिळवू शकता. यासाठी तुम्हाला रेल्वेच्या या खास फीचरबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. चला, स्टेप-बाय-स्टेप संपूर्ण पद्धत समजून घेऊया.
'करंट तिकीट'ने बुक करू शकता सीट
IRCTC चे एक खूप छान फीचर आहे. ते म्हणजे करंट तिकीट बुकिंग. त्याच्या मदतीने तुम्ही ट्रेनचा चार्ट बनल्यानंतरही कन्फर्म तिकीट बुक करू शकता. वास्तविक, ट्रेन सुटण्यापूर्वी काही वेळा लोक आपले तिकीट रद्द करतात. त्यावेळी ज्या जागा रिकाम्या होतात, त्या IRCTC द्वारे 'करंट तिकीट' अंतर्गत बुक केल्या जाऊ शकतात.
कोणत्या क्लासमध्ये सीट मिळू शकते?
करंट तिकीट सर्व क्लाससाठी असतेय. त्यात फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, थर्ड इकोनॉमी आणि स्लीपर क्लास यांचा समावेश आहे. जर या क्लासमध्ये कोणतीही सीट चार्ट बनल्यानंतर रिकामी राहिली, तर तुम्ही ती बुक करू शकता. ते तुमच्यासाठी सहज आणि सोपं आहे. शिवाय शेवटच्या क्षणी तुम्हाला तुमची हक्काची सीट मिळते.
करंट तिकीट बुकिंग कसे करावे?
करंट तिकिटाची बुकिंग (IRCTC Current Booking) ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे होते. तुम्ही ट्रेन सुटण्याच्या 3-4 तास आधी IRCTC च्या अधिकृत वेबसाइट, मोबाइल ॲपवर किंवा रेल्वे तिकीट आरक्षण बुकिंग (IRCTC Current Reservation) काउंटर म्हणजे तिकीट विंडोवरून सहजपणे करंट तिकिटाची उपलब्धता तपासू शकता.
मोबाइल ॲपवरून ही शक्य
- IRCTC ॲप उघडा आणि लॉग-इन करा.
- होम पेजवर 'Train' वर क्लिक करा.
- त्यानंतर 'Chart Vacancy' वर जा.
- आता ट्रेन नंबर, तारीख आणि स्टेशन टाका.
- ज्या क्लासमध्ये सीट तपासायची आहे, त्यावर क्लिक करा.
- तुम्हाला कुठे-कुठे सीट रिकाम्या आहेत, याची संपूर्ण माहिती मिळेल.
वेबसाइटवरूनही करू शकता करंट तिकीट चेक
- IRCTC च्या या वेबसाइटवर जा.
- ट्रेन नंबर, प्रवासाची तारीख आणि बोर्डिंग स्टेशन भरा.
- 'Get Train Chart' वर क्लिक करा.
- सीटची संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर येईल.
सीट दिसल्यास टीटीईला भेटून घ्या तिकीट
जर ॲप किंवा वेबसाइटवर सीट रिकामी दिसत असेल आणि ट्रेन सुटली असेल, तर तुम्ही थेट टीटीईला भेटून मॅन्युअल तिकीट घेऊ शकता. भाडे देऊन तो तुम्हाला जागेवरच सीट अलॉट करेल. ही सीट रिकामी असल्यास ती तुम्हाला दिली जाईल.
करंट बुकिंगमध्ये कन्फर्म सीट मिळण्याची शक्यता किती?
जर तुम्ही अशा मार्गावर प्रवास करत असाल जिथे जास्त गर्दी नाही, तर करंट तिकिटाने कन्फर्म सीट मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. पण सणांसारख्या काळात, जिथे ट्रेन पूर्ण भरलेल्या असतात, तिथे ही शक्यता थोडी कमी असू शकते. तरीही, प्रयत्न नक्कीच केला पाहिजे कारण अनेकदा शेवटच्या क्षणीही सीट रिकामी मिळू शकते.
करंट तिकीट बुकिंग फीचर का खास आहे?
- तत्काल तिकीट न मिळाल्यासही शेवटच्या क्षणी कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता.
- एजंटपासून वाचून स्वतः सीट बुक करण्याची सुविधा.
- नॉर्मल तिकिटापेक्षा थोडे स्वस्त भाडे.
- ट्रेन सुटण्याच्या 5-10 मिनिटे आधीपर्यंत बुकिंग शक्य.
आता ट्रेनमध्ये तिकीट न मिळाल्यास निराश होण्याची गरज नाही. IRCTC चे 'करंट तिकीट' फीचर तुम्हाला शेवटच्या क्षणीही कन्फर्म सीट मिळवून देऊ शकते. पुढच्या वेळी प्रवासाला निघण्यापूर्वी तुम्ही ही ट्रिक वापरून पाहू शकता.