अमेरिकेतून हद्दपार करण्यापूर्वी न्यू जर्सीमधील नेवार्क विमानतळावर अधिकाऱ्यांनी एका भारतीय विद्यार्थ्याला मारहाण केली. त्याला बेड्या घालण्यात आल्या आणि जमिनीवर ढकलण्यात आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
हा व्हिडिओ एका भारतीय अमेरिकन उद्योजक कुणाल जैन यांनी रेकॉर्ड केला होता. यामध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्याला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक केली. या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याला जमिनीवर ढकलण्यात आल्याचं दिसून येत आहे. यात चार अधिकाऱ्यांनी त्याला पकडून ठेवलं आहे. ज्यामध्ये दोन अधिकारी त्याच्या पाठीवर गुडघे रेतून उभा आहे. तर दोघांनी त्याच्या हाता पायाला बेड्या घालण्यात आल्या आहेत.
कुणाल जैन यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, एका भारतीय विद्यार्थ्याला नेवार्क विमानतळावरुन हद्दपार केलं जात होतं. त्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे त्याला वागणूक दिली जात होती. तो त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करीत येथे आला होता. कोणालाही काही त्रास देत नव्हता. एक एनआरआय म्हणून मला हे दृश्य खूप त्रासदायक वाटतंय.