अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे झालेल्या रस्ते अपघातात साताऱ्यातील तरुणी निलम शिंदे गंभीर जखमी झाली आहे .अपघानंतर निलम शिंदे कोमात आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी अमेरिकन दूतावासाने नीलम शिंदे हिच्या कुटुंबीयांना व्हिसा मंजूर केला आहे. व्हिसा मिळाल्यानंतर नीलमचे वडील, चुलत भाऊ आणि काका अमेरिकेला जाणार आहेत. नीलमच्या कुटुंबीयांनी एनडीटीव्हीला सांगितले की व्हिसा मुलाखत सोपी होती. उद्या आपण आपल्या मुलीला भेटायला जाऊ.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सातारा येथील नीलम शिंदे 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली होती. तेव्हापासून ती रुग्णालयात कोमात आहे. निलम हीच्या डोक्याला, हाताला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने नीलमच्या कुटुंबाच्या अमेरिकेकडे तात्काळ व्हिसाच्या विनंतीचा मुद्दा उपस्थित केला होता.
(नक्की वाचा- Neelam Shinde: अमेरिकेत लेकीची मृत्यूशी झुंज, साताऱ्यातील पालकांची व्हिसासाठी धडपड; केंद्रीय मंत्र्यांकडेही जोडले हात पण...)
निलमच्या अपघातानंतर 48 तासांनी तिच्या कुटुंबाने व्हिसासाठी अर्ज केला. पण त्यांना मिळालेला मुलाखतीचा स्लॉट पुढच्या वर्षीचा होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने निलमच्या कुटुंबीयांच्या अमेरिकेकडे तात्काळ व्हिसाच्या विनंतीचा मुद्दा उपस्थित केला होता. जो आता स्वीकारण्यात आला आहे. निलमच्या कुटुंबाला व्हिसा मिळाला आहे.
(नक्की वाचा- Swargate Case: ...तर 'ती' वासनेचा बळी झाली नसती! स्वारगेट स्थानकात सुरु होते 'हे' काळे धंदे; वाचा स्फोटक रिपोर्ट)
काय आहे प्रकरण?
14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली होती. निलम शिंदे गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेली आढळली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 58 वर्षीय आरोपी लॉरेन्स गॅलोने निलमला वाहनाने धडक दिली आणि पळून गेला होता. सॅक्रामेंटो अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी निलमला रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर पाच दिवसांनी आरोपीला 19 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.