Girl student dies in Canada : कॅनडामध्ये गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता भारतीय विद्यार्थिनी वंशिकाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. तिचा मृतदेह समुद्राच्या किनाऱ्यावर सापडला आहे. ओटावामधील भारतीय उच्चायुक्तालयाने वंशिकाच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वंशिका गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होती. ती आप नेता आणि आमदार कुलजीत सिंह रंधावा यांचे जवळचे सहकारी देविंदर सिंह यांची मुलगी होती. वंशिका पंजाबमधील डेरा बस्सी येथे राहणारी होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डिप्लोमा कोर्स करण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी अंशिकाला ओटावाला पाठवण्यात आलं होतं. आता तिच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबाला धक्का बसला आहे.
नक्की वाचा - Kashmir Zipline Video : 7 मिनिटांच्या अंतराने वाचलो, हल्ल्यावेळी झिपलाइन व्हिडिओ करणाऱ्या ऋषि भट्टचा धक्कादायक अनुभव
कॅनडात भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू...
ओटावाच्या भारतीय उच्चायुक्तालयाने एक्सवर पोस्ट करीत याबाबत माहिती दिली. ओटावामध्ये भारतीय विद्यार्थिनी वंशिकाच्या मृत्यूच्या बातमीचं आम्हाला अत्यंत दु:ख आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुद्दा संबंधित अधिकाऱ्यांसमोर उचलण्यात आला आहे. याशिवाय या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
वंशिका बेपत्ता झाल्यानंतर ओटावातील हिंदी समुदायाने पोलिसांना एक पत्र लिहिलं होतं. यानुसार, वंशिका कथितपणे 25 एप्रिलच्या सायंकाळपासून बेपत्ता झाली होती. ती आपलं घर 7 मॅजेस्टिक ड्राइव येथून साधारण सात्री 8-9 दरम्यान नवं घर (भाड्याने) पाहण्यासाठी गेली होती. यानंतर तिचा फोन सातत्याने बंद येत होता. ज्यानंतर कुटुंबाकडून चिंता व्यक्त केली जात होती. दुसऱ्या दिवशी तिची परीक्षा होती. कुटुंबीय आणि मित्रांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याबद्दल काहीच कळू शकलं नाही.