
Kashmir Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित एक व्हिडिओ सोमवारी समोर आला आहे. हा व्हिडिओ पहलगाममधील बैसरन घाटात झिपलाइनचा आनंद घेत असलेल्या प्रवाशाचा आहे. पहलगाम हल्ल्याचा हा व्हिडिओ आतापर्यंत आलेल्या व्हिडिओंपैकी सर्वात भयंकर असल्याचं सांगितलं जात आहे. कारण या व्हिडिओमध्ये पर्यटकांना गोळी झाडताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झिपलाइनवर असल्या कारणाने ऋषिचा जीव वाचला. अन्यथा दहशतवाद्यांनी त्याचाही जीव घेतला असता. अखेर झिपलाइनचा आनंद घेणाऱ्या ऋषि भट्टचा धक्कादायक अनुभव समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
झिपलाइनवर असताना झाला दहशतवादी हल्ला...
ऋषि भट्टने सांगितलं, आम्ही दुपारी पहलगामला पोहोचलो होतो. आम्ही मिनी स्वित्झर्लंडमध्ये अनेक व्हिडिओ शूट केले. अनेक फोटोही काढले. तोपर्यंत सर्व छान सुरू होतं. यानंतर आम्ही झिपलाइनचं तिकीट घेतलं. आमच्या आधीत तीन जणाचे दोन कुटुंब होतं. त्यानंतर आमचा नंबर होतो. माझा नंबर येईपर्यंत सर्वजणं खाली गेले होते. माझी पत्नी आणि मुलगादेखील खाली पोहोचले होते. जेव्हा मी झिपलाइन सुरू केलं तेव्हा गोळीबार सुरू झाला होता. साधारण दुपारी 1.28 ची वेळ असेल. मला तोपर्यंत काहीच माहिती नव्हतं. मी आनंदात होतो. खाली काय सुरूये याचा मला अंदाजही नव्हता.
नक्की वाचा - Pahalgam attack: हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानचा थरकाप, POK मधील दहशतवादी तळाची 'अशी' झाली स्थिती
7 मिनिटांमुळे माझा जीव वाचला...
ऋषि पुढे म्हणाले, माझी पत्नी आणि मुलगा आधीच झिपलाइन करून खाली पोहोचले होते. त्यानंतर काही वेळाने मी खाली पोहोचलो होतो. दहशतवाद्यांचा तिसरा टार्गेट मी होतो. मात्र नशीबाने वाचवलं. झिपलाइनवर माझा नंबर होता,तोच आणखी दोन मुलं आले आणि मला आधी जाण्याची विनंती केली. त्या दोघांनाही मी पुढे जाऊ दिलं आणि माझा जीव वाचला. त्या सात मिनिटात माझा जीव वाचला.
Another video of Pahalgam Terrorist Attack.
— Tapashish Chakraborty (@TapashishC) April 28, 2025
People running, getting shot, falling mid-step.
Also observe the zipline operator saying “Allah hu Akbar” just as the first shots go off.
He was at a vantage point, he'd have seen the attack before everyone.
This is pure evil. pic.twitter.com/UrYLbKbExn
सुरुवातीला आनंदात होतो...
ऋषि भट्टने पुढे सांगितलं की, झिपलाइनवर तब्बल 20 सेंकदापर्यंत मी मजेत होतो, व्हिडिओ शूट करीत होतो. त्यानंतर गोळ्याचा आवाज येऊ लागला आणि दहशतवादी हल्ला झाल्याचं लक्षात आलं. मैदानात लोक खाली कोसळत होते. झिपलाइन संपतान मी खाली उडी मारली. मी खाली उतरताच माझी पत्नी आणि मुलं धावत माझ्याजवळ आले. धावत धावत आम्ही एक खड्ड्याजवळ पोहोचलो. आधीपासून काही लोक तेथे लपून बसले होते. आम्हीदेखील तेथे लपलो. सात-आठ मिनिटांनंतर आम्ही तेथून पळून गेलो. यादरम्यान अचानक गोळ्यांचा आवाज आला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world