गुजरातमध्ये सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे. बडोद्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका भारतीय महिला क्रिकेटपटू राधा यादव हिला बसला. ती बडोद्यात हरानी भागात अर्नय अपार्टमेंटमध्ये राहाते. या भागात जवळपास चार ते पाच फुट पाणी भरले होते. घरात सर्व सदस्य होते. करायचे काय असा प्रश्न तिला पडला होता. त्यावेळी बडोदा महापालिका आणि अग्निशमन दल तिच्या मदतीला आले. बोटीतून तिला आणि तिच्या घरच्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर राधा आपल्या काकांच्या घरी सुखरूप आहे. त्यासाठी तिने बडोदा महापालिका आणि अग्निशमन दलाचे इन्साटवर पोस्ट करत आभार मानले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राधा यादव ही भारतीय महिला क्रिकेत संघात फिरकीपटू आहे. ती मुंबईहून 25 तारखेला बडोद्याला आपल्या घरा आली होती. त्याच वेळी जोरदार पाऊस सुरू होता. हा पाऊस काही वेळात थांबेल अशी तिला अपेक्षा होती. पण पाऊस काही थांबला नाही. ती राहात असलेल्या ठिकाणी आणि आजूबाजूला पाणी भरत होते. पाणी चांगलेच चार ते पाच फुटापर्यंत भरले होते. अशी स्थिती तिने कधीही पाहीली नव्हती. त्यात विजही गेली. शिवाय घरात आवश्यक असणारे खाद्य पदार्थही नव्हते. त्यामुळे स्थिती आणखी बिकट झाल्याचे राधा सांगते.
ट्रेंडिंग बातमी - वाढवण बंदराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन, तर काँग्रेस आंदोलनाच्या तयारीत
संपूर्ण शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. राधा ज्या ठिकाणी राहाते त्या ठिकाणी ही पाणी भरले होते. घरामध्ये राधा आपल्या कुटुंबीयांसह अडकली होती. अशा वेळी तिने आपल्या काकांना कसाबसा संपर्क केला. तिचे काकाही शहरात राहातात. त्यानंतर ते आणि त्यांचा मित्र ती राहात असलेल्या कॉलनीत पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ बडोदा महापालिका आणि अग्निशमन दलाचे पथकही आले. त्यांनी तिथे बोटी उपलब्ध करून दिल्या. शिवाय खाण्यासाठी अन्नही दिले. त्यानंतर राधा आणि तिच्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. राधा सध्या तिच्या काकांच्या घरी आहे.
भारतीय महिला संघ टी 20 विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात राधा यादव हिचा समावेश आहे. ती एक फिरकीपटू आहे. शिवाय ती चांगली फलंदाजीही करते. त्यामुळे संघातील ऑलराऊंडर खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहीले जाते. तिच्यावरच असा प्रसंग बडोद्यामध्ये आला, हे तिने स्वत: सांगितले आहे. या कठीकण प्रसंगातून सुटल्यानंतर तिने सोशल मीडियावर बडोदा महापालिका आणि अग्निशमन दलाचे आभार मानले आहे.