जाहिरात
This Article is From Aug 30, 2024

वाढवण बंदराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन, तर काँग्रेस आंदोलनाच्या तयारीत

या बंदरासाठी 76 हजार 200 कोटी रूपये खर्च करून ते उभारण्यात येणार आहे. जगातील मोठ्या बंदरां पैकी एक बंदर हे ठरणार आहे.

वाढवण बंदराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन, तर काँग्रेस आंदोलनाच्या तयारीत
मुंबई:

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हस्ते पालघर येथील वाढवण बंदराचे भूमिपूजन आज शुक्रवारी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी एक वाजत हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या बंदरासाठी 76 हजार 200 कोटी रूपये खर्च करून ते उभारण्यात येणार आहे. जगातील मोठ्या बंदरां पैकी एक बंदर हे ठरणार आहे. असा विश्वास केंद्रीय जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या बंदराचे वैशिष्ट्य म्हणजे 300 दशलक्ष टन मालवाहतूक या बंदरातून होणार आहे. तर जवळपास 23 दशलक्ष कंटेनर हाताळणी करण्याची क्षमता या बंदरात आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हे बंदर दोन टप्प्यात उभारले जाईल.अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या बंदराच्या उभारणी वेळी केला जाणार आहे. शिवाय पायाभूत सुविधांनी युक्त असे हे बंदर असेल. हे बंदर आंतरराष्ट्रीय मार्गांना थेट जोडले जाणार आहे. यामुळे वेळ आणि पैसा याची बचत होणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  हॅलोsss मी मुंबई पोलीस बोलतो, एक फोन कॉल अन् निवृत्त मेजर जनरल झाला कंगाल

विशेष म्हणजे या बंदरामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. गेल्या दहा वर्षात देशातील 12 प्रमुख बंदरांचे अधुनिकीकरण करण्यात आले आहे. वाढवण बंदरामुळे देशातील बंदरांची ताकद आणखी वाढणार आहे.दरम्यान हे बंदर उभारणीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. शिवाय भूसंपादनामुळे स्थानिकांना चांगले पुनर्वसन पॅकेज ही दिले जाणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - आधी सहकार्याची हत्या, नंतर स्वत:वर गोळी झाडली, चक्रावून सोडणाऱ्या 'त्या' हत्याकांडाचे गुढ उकललं

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर आणि मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याच वेळी काँग्रेस त्यांच्या विरोधात निदर्शने करण्याची तयारी करत आहे. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे येथे ही निदर्शने केली जाणार आहेत. राजकोट सिंधुदुर्ग  मध्ये घडलेल्या घटनेबदल पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी यासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे.
  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: