कोविशील्ड लसीमुळे भारतीयांना धोका? डॉ. रवी गोडसे काय म्हणाले?

कोविशील्डची लस घेतलेल्या भारतीयांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र त्यांना खरंच चिंता करण्याची आवश्यकता आहे का, याबाबत NDTV मराठीने डॉ. रवी गोडसे यांच्याशी बातचीत केली. 

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

ब्रिटेनची फार्मा कंपनी AstraZeneca ने कोविड लसीच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी आणली आहे. काही दिवसांपूर्वी या लसीमुळे गंभीर दुष्परिणांना सामोरं जावं लागत असल्याचं समोर आल्यानं गोंधळ उडाला होता. यावेळी कंपनीने गंभीर साइड इफेक्ट होत असल्याची कबुली दिली होती. आता कंपनीकडून व्यावसायिक कारण या लसीच्या खरेदी विक्रीवर बंदी आणली आहे. 2020 मध्ये या फॉर्म्युल्याचा वापर करीत सीरम इन्स्टिट्यूटने भारतात कोविशील्ड नावाच्या लसीची निर्मिती केली होती. त्यामुळे कोविशील्ड लस घेतलेल्या भारतीयांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र त्यांना खरंच चिंता करण्याची आवश्यकता आहे का, याबाबत NDTV मराठीने डॉ. रवी गोडसे यांच्याशी बातचीत केली. 

प्रश्न -  AstraZeneca ने तयार केलेल्या कोविशील्डची  लस घेतलेल्या भारतीयांना चिंता करावी का? 
उत्तर - भारतातील ज्या लोकांनी कोविशील्ड घेतली त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. ही गंभीर गाठ अत्यंत दुर्मीळ आहे. रक्ताची गंभीर स्वरुपातील गाठ व्हायची असती तर पहिल्या लसीनंतर 30 दिवसांनंतर झाली असती, त्यामुळे आता चिंतेच कारण नाही. गाठी दोन प्रकारच्या असतात एक रक्तवाहिन्यांशीसंबंधित आणि दुसरी व्हेन किंवा शिरांसंबंधित (Vain). कोविशील्डमुळे निर्माण होणारी गाठ शिरांसंबंधित आहे. मात्र तरुणांमध्ये हार्टअटॅक, स्ट्रोकचं कारण रक्तवाहिन्या आहेत. त्यामुळे कोविशील्डचे दोन डोस घेतले असतील तरी चिंता करू नका. 14 आठवड्यानंतर याचा प्रभाव हळूहळू कमी होतो. त्यामुळे कोविडचा विचार डोक्यातून काढून टाका.

Advertisement

नक्की वाचा - AstraZeneca चा मोठा निर्णय; कोविशील्डच्या दुष्परिणामांनंतर उचललं मोठं पाऊल

प्रश्न - कोविशील्ड व्यतिरिक्त इतर लसींमुळे दुष्परिणाम होऊ शकतात?
उत्तर -  कोविशील्ड व्यतिरिक्त भारतात कोवॅक्सिन लस घेतली जात होती. कोवॅक्सिन ही भारतीय बनावटीची लस आहे. त्याचा आणि दुर्मीळ गाठीचा काहीही संबंध नाही. अमेरिकेत MRN अंतर्गत फायझर आणि मॉडर्ना या दोन लसी होत्या. त्यामुळे तरुणांना त्यातही वयाच्या 25 पेक्षा कमी असलेल्यांना हृदयाशीसंबंधित थोडा त्रास होऊ शकत होता. परंतु या लसी भारतात आल्या नाहीत. भारतातील कोविशील्ड ही लस Adenovirus vaccine technology ची  होती. या टेकनॉलॉजिच्या जगभरात चार लसी होत्या. पहिली कोविशील्ड, दुसरी रशियामध्ये स्पुतनिक, तिसरी चीनमधील कॅन्सिनोबायो आणि चौथी अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्स. या चारही लसीमध्ये काही अंशी दुष्परिणाम जाणवल्याचं दिसलं. परंतु याचं प्रमाण अत्यल्प होतं. त्यातही युरोपीय लोकांच्या तुलनेत भारतीयांमध्ये हे प्रमाण कमी होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या लसीमुळे आपण गंभीर आजारांपासून वाचलो. 160 देशांमध्ये 300 कोटी डोस विकले गेले होते. 

Advertisement

प्रश्न - तरुणांमध्ये वाढत्या हृदयविकारांचा आणि या लसीचा संबंध आहे का?
उत्तर - तरुणांमधील वाढता हृदयविकारांचा आणि या लसीचा काहीही संबंध नाही. लसीचा विचार करणं आता आपण थांबवायला हवं. याचा परिणाम लस घेतल्याच्या पहिल्या काही आठवड्यातच दिसून आला असता. त्यामुळे नागरिकांनी याचा फार विचार करू नये. 

Advertisement

Topics mentioned in this article