Haryana News: 'विमान उडवायची लायकी नाही, चपला शिव..', ट्रेनी पायलटचा छळ, इंडिगो एयरलाईन्सच्या तिघांवर गुन्हा

Indigo Employees casteist Abuse: गुरुग्राममध्ये एका बैठकीदरम्यान गैरवर्तन तसेच सर्वांसमोर त्याचा अपमान केल्याचा आरोप या ट्रेनी पायलटने केला आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण?

जाहिरात
Read Time: 2 mins

हरियाणा:  हरियाणातील गुरुग्राममध्ये इंडिगो एअरलाइन्सच्या कॅप्टनसह 3 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. इंडिगोच्या एका ट्रेनी पायलटने ही एफआयआर दाखल केली आहे. या तिघांनी जातीचा उल्लेख करत छळ केल्याचा तसेच गुरुग्राममध्ये एका बैठकीदरम्यान गैरवर्तन तसेच सर्वांसमोर त्याचा अपमान केल्याचा आरोप या ट्रेनी पायलटने केला आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण? वाचा सविस्तर..

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पीडित ट्रेनी पायलटच्या आरोपानुसार,  ड्युटीवर असताना त्याच्यावर अनेक वेळा जातीवरून टीका करण्यात आली. त्याची जात सांगून सर्वांसमोर त्याचा अपमान करण्यात आला. अनेक वेळा चूक नसताना नोटीस देखील देण्यात आली. कोणतेही वैध कारण न देता पगारही कापण्यात आला आणि वैद्यकीय रजाही कापण्यात आली. इतकेच नाही तर कर्मचाऱ्यांचा प्रवास रद्द करण्यात आला आणि त्याच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणण्यात आला.  तापस डे, मनीष साहनी आणि कॅप्टन राहुल पाटील यांच्यावर हे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.  यापूर्वी पिडीत पायलटने इंडिगोच्या सीईओ आणि नीतिमत्ता समितीकडेही याबद्दल तक्रार केली होती, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही.

पिडीत ट्रेनी पायलटचे आरोप काय?

वरिष्ठांनी  तो विमान उडवण्यास योग्य नाही, तर त्याने बूट शिवावेत असे म्हणत अपमान केला.  इथे तुझी चौकीदारी करायचीही योग्यता नाही, असं म्हणत अपमान केला.  जातीच्या आधारावर त्याला मारहाण करण्यात आली, विनाकारण पगार कापण्यात आला. इंडिगोकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शेवटी त्याला पोलिस तक्रार दाखल करण्यास भाग पाडण्यात आले. दरम्यान, इंडिगो एअरलाइनने अद्याप या प्रकरणावर भाष्य केलेले नाही.

Love Story: नवऱ्यासमोरच पत्नीने केलं पुतण्यासोबत लग्न! अजब प्रेमाची देशभर चर्चा

हा गुन्हा बेंगळुरू शहरातील (कर्नाटक) शोभा सिटी सँटोरिनी येथे राहणाऱ्या 35 वर्षीय पीडितेने नोंदवला आहे. तो इंडिगो एअरलाइन्समध्ये काम करतो.  पीडित कर्मचारी द्रविड समुदायाचा आहे. पीडित कर्मचाऱ्याने बेंगळुरूमध्ये त्याच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी शून्य एफआयआर दाखल करून तो गुरुग्रामला पाठवला. जिथे डीएलएफ फेज-1 पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

Advertisement