जाहिरात

Shocking: लाडकी लेक घरासमोरच संपली! कारमध्ये 2 तास ऑक्सिजनसाठी धडपड; मन सुन्न करणारी घटना

Child death in car : घराच्या अंगणात उभ्या असलेल्या कारची चावी एका 4 वर्षांच्या चिमुकलीच्या हाती लागली, आणि....

Shocking: लाडकी लेक घरासमोरच संपली! कारमध्ये 2 तास ऑक्सिजनसाठी धडपड; मन सुन्न करणारी घटना
Child death in car : खेळता खेळता तिला आजोबांच्या कारची चावी सापडली आणि ती कारमध्ये शिरली.
मुंबई:

Child death in car : घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्यांच्या बाबतीत पालक अनेकदा निर्धास्त असतात, पण कधीकधी खेळता खेळता त्यांच्या हाती लागलेली एखादी साधी गोष्टही जीवावर बेतू शकते. अशीच एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. घराच्या अंगणात उभ्या असलेल्या कारची चावी एका 4 वर्षांच्या चिमुकलीच्या हाती लागली. खेळण्याच्या नादात तिने कार उघडली आणि ती आत जाऊन बसली. मात्र, काही क्षणातच कारचे दरवाजे आपोआप लॉक झाले आणि त्या चिमुकलीचा गुदमरून दुर्दैवी अंत झाला.

काय आहे प्रकरण?

 मध्य प्रदेशातील इंदूर येथील जूनी परिसरात असलेल्या नंदनवन कॉलनीमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. 4 वर्षांची बेबी हाजरा सोमवारी घराबाहेर खेळत होती. तिचे वडील लोखंडाचे व्यापारी आहेत आणि आजोबा साबीर हुसेन यांच्यासोबत ट्रक वर्कशॉप चालवतात. हाजरा ही दोन भावंडांमध्ये सर्वात लहान होती. खेळता खेळता तिला आजोबांच्या कारची चावी सापडली आणि ती कारमध्ये शिरली, जी तिच्या आयुष्यातील शेवटची चूक ठरली.

( नक्की वाचा : Dombivli News :आई बेपत्ता, बापाकडे पुरावा नाही; डोंबिवलीच्या 'त्या' 3 मुलांच्या अडचणी पाहून पोलिसही चक्रावले )

कशी घडली ही दुर्दैवी घटना?

हाजरा कारच्या मागच्या सीटवर जाऊन बसली, मात्र कारचे दरवाजे आणि खिडक्या ऑटोमॅटिक असल्याने ती आत बसताच कार लॉक झाली. बाहेर प्रचंड ऊन असल्याने कारमधील तापमान वेगाने वाढले. तब्बल 2 तास ही चिमुकली त्या गरम झालेल्या कारमध्ये अडकून पडली होती. खिडक्या पूर्णपणे बंद असल्याने आतील ऑक्सिजन संपला आणि तिचा जीव गुदमरला. घरातील लोक तिला सर्वत्र शोधत होते, पण ती घरासमोरच उभ्या असलेल्या कारमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे, याची कोणालाच कल्पना नव्हती.

दोन तासांच्या शोधाशोधनंतर जेव्हा कुटुंबीयांची नजर कारवर गेली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारच्या मागच्या सीटवर हाजरा बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. घाईघाईने तिला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतदेहाचे पोस्टमॉर्टम जिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण कॉलनीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com