जाहिरात

INS Malwan: चीनचा माज उतरवण्यासाठी भारत सज्ज! 350 वर्षांनंतर शिवरायांचे 'गनिमी कावे' समुद्राच्या तळाशी चालणार

INS Malwan commissioning Indian Navy: इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो ही म्हण आता अरबी समुद्राच्या लाटांवर प्रत्यक्ष सत्यात उतरताना दिसत आहे.

INS Malwan:  चीनचा माज उतरवण्यासाठी भारत सज्ज! 350 वर्षांनंतर शिवरायांचे 'गनिमी कावे' समुद्राच्या तळाशी चालणार
INS Malwan : या जंगी जहाजाच्या नामांतरामागे एक अत्यंत गौरवशाली इतिहास दडला आहे.
मुंबई:


INS Malwan commissioning Indian Navy:  इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो ही म्हण आता अरबी समुद्राच्या लाटांवर प्रत्यक्ष सत्यात उतरताना दिसत आहे. 17 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रणनीतीच्या जोरावर परकीय जुलमी सत्तांना समुद्रात रोखून धरले होते, त्याच गनिमी काव्याचा आणि छत्रपतींच्या दूरदृष्टीचा प्रत्यय आता भारतीय नौदलाच्या नव्या ताकदीतून जगाला येत आहे. 

भारतीय नौदलाच्या ताफ्यात 22 जुलै 2026 रोजी आयएनएस मालवण ही अत्याधुनिक युद्धनौका अधिकृतपणे दाखल झाली आहे. पाण्याखाली दडून बसलेल्या शत्रूचा शोध घेऊन त्याचा समुद्रातच खात्मा करण्याची क्षमता असणारी ही युद्धनौका म्हणजे भारताच्या सागरी सुरक्षेतील एक नवा अध्याय मानली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती अन् मालवणचे ऐतिहासिक कनेक्शन

या जंगी जहाजाच्या नामांतरामागे एक अत्यंत गौरवशाली इतिहास दडला आहे. 17 व्या शतकात जेव्हा परकीय जलदलांचा भारताच्या किनारपट्टीवर डोळा होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील मालवणच्या किनारपट्टीवर सिंधुदुर्ग हा अभेद्य सागरी किल्ला उभारला होता. 

या किल्ल्यावरून मराठ्यांचे आरमार शत्रूला किनाऱ्याजवळ येण्यापूर्वीच समुद्राच्या पाण्यातच रोखून धरत असे आणि त्यांचा पुरता खात्मा करत असे. बरोबर 350 वर्षांनंतर भारतीय नौदलाने याच ऐतिहासिक संकल्पनेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आपल्या नव्या युद्धास्त्राचे नाव मालवन ठेवले आहे. यापूर्वी 2003 मध्ये निवृत्त झालेल्या नौदलाच्या एका जहाजाचे नावही मालवणच होते.

( नक्की वाचा : Raja Shivaji चित्रपटाने उलगडले इतिहासातील विसरलेले पान; कोण होते शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे? )
 

INS Malwan चे काय आहे वैशिष्ट्य?

नेव्हीच्या भाषेत सांगायचे तर हे माहे श्रेणीतील अँटी सबमरीन शॅलो वॉटर क्राफ्ट आहे. नौदलात विशालकाय विमानवाहू जहाजांची चर्चा नेहमी होते, पण समुद्रातील सर्वात मोठा धोका हा लपून वार करणाऱ्या पाणबुड्यांचा असतो. आयएनएस मालवण हे आकाराने खूप मोठे किंवा अवजड नाही, तर ते अत्यंत हलके आणि चपळ आहे. 

छत्रपतींच्या गनिमी काव्याप्रमाणेच हे युद्धपोत अत्यंत शांतपणे आणि आवाज न करता समुद्राच्या पाण्यात वावरते. यामध्ये वापरण्यात आलेले वॉटर जेट प्रोपल्शन तंत्रज्ञान आणि ताशी 25 नॉट्सचा वेग शत्रूच्या पाणबुडीला पळून जाण्याची कोणतीही संधी देत नाही.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com