International Yoga day 2025: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशाखापट्टणम येथे पंतप्रधान मोदींनी योगासन केले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू देखील उपस्थित होते. या वर्षीच्या योग दिनाची थीम 'एक पृथ्वी एक आरोग्य' आहे. या खास प्रसंगी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज योग हा सर्वांचा आणि सर्वांसाठी आहे. ते म्हणाले की, योगाने संपूर्ण जगाला जोडले आहे. आज संपूर्ण जग योगासाठी एकत्र उभे आहे. योगाची व्याप्ती प्रत्येक दिवसाबरोबर वाढत आहे. योग शांततेला दिशा देतो.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
'गेल्या दशकातील योगाच्या प्रवासाकडे पाहताना मला अनेक गोष्टी आठवतात. भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि अगदी कमी वेळातच जगातील 175 देश आपल्या देशासोबत उभे राहिले. ही एकता आणि पाठिंबा आजच्या जगात सामान्य घटना नाही. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी जगातील लोकांना शुभेच्छा देतो. आज संपूर्ण जग योग करत आहे. योग म्हणजे जोडणे, आणि योगाने संपूर्ण जगाला कसे जोडले आहे हे पाहणे खूप छान आहे,' असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
यावेळी पुढे बोलताना PM मोदी म्हणाले की, ' योगाचा साधा अर्थ जोडणे आहे आणि योगाने संपूर्ण जगाला कसे जोडले आहे हे पाहणे आनंददायी आहे. सिडनी ऑपेरा हाऊसच्या पायऱ्या असोत, एव्हरेस्टची शिखरे असोत किंवा समुद्राचा विस्तार असो. सर्वत्र एकच संदेश येतो - योग सर्वांचा आहे आणि सर्वांसाठी आहे. मी ते आपण हा प्रवास सेवा, समर्पण आणि सहअस्तित्वाचा आधार आहे. ही विचारसरणी सामाजिक सौहार्दाला प्रोत्साहन देते. दुर्दैवाने, आज संपूर्ण जग एका प्रकारच्या तणावातून जात आहे. अनेक क्षेत्रांमध्ये अशांतता आणि अस्थिरता वाढत आहे. अशा परिस्थितीत, योग आपल्याला शांतीची दिशा देतो''
Yoga Day 2025: बेलीफॅटपासून ते पचनप्रक्रियेपर्यंतच्या सर्व समस्या होतील दूर, या आसनांचा करा सराव