भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकारी जनदीप कौर तिवाना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. त्यांचे सुंदर फोटे व्हायरल झाले आहेत. जशी त्यांच्या सौंदर्याबाबत चर्चा सुरू आहे तशीच त्यांच्या संघर्षाची कथा ही समोर आली आहे. त्यांनी नुकतेच स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर समुद्रकिनाऱ्यावरील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या फोटोवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडला आहे. त्यानंतर जनदीप कौर या चर्चेत आल्या आहेत.
सध्या त्या तेलंगणातील हैदराबाद येथील 'सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी' (SVPNPA) मध्ये आपले पोलीस प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. जनदीप कौर मूळच्या पंजाबमधील फतेहगड साहेब जिल्ह्यातील आहेत. चनार्थल खुर्द हे त्याचं गाव आहे. त्या याच गावात लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण गावातूनच पूर्ण केले. त्यानंतर थापर युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल विषयात B.Tech पदवी घेतली.
सुरुवातीला विशेष तयारीशिवाय यूपीएससी परीक्षा त्यांनी दिली होती. पण त्यात त्यांना यश आलं नाही. पहिल्याच प्रयत्ना त्यांच्या पदरी अपयश आलं. मात्र त्यांनी हिंमत हरली नाही. 2018 मध्ये SSC CGL परीक्षेत संपूर्ण देशात 68th रँक त्यांनी मिळवला. त्या इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर बनल्या. मात्र त्यांना यात जास्त रुची नव्हती. त्यांना आयपीएस व्हायचे होते. त्यातून त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाही. एकीकडे त्या इन्कम टॅक्स विभागात काम करत होत्या तर दुसरीकडे त्यांनी युपीएससीची तयारी सुरू ठेवली होती.
Pune Nasrapur Case: 'आम्हाला अंधारात ठेवू नका'; नसरापूर प्रकरणातील पीडित कुटुंबाची सरकारला कळकळीची विनंती
इन्कम टॅक्स विभागात काम करत असताना आयआरएस (IRS) अधिकाऱ्यांना पाहून जनदीप यांना पुन्हा यूपीएससी देण्याची प्रेरणा मिळाली. मात्र, दिवसा नोकरी असल्यामुळे ऑफलाईन कोचिंग शक्य नव्हते. त्यांनी संपूर्ण सिलॅबस 5 ते 6 भागांत विभागला. त्यानंतर रात्रीच्या वेळी यूट्यूब व ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अभ्यास सुरू केला. अखेर यूपीएससी 2024 च्या परीक्षेत ऑल इंडिया 147th रँक मिळवून त्यांनी आपले आयपीएस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.