जाहिरात

IRCTC Down: रेल्वेचं तिकीट बुकिंग करताना तांत्रिक बिघाडामुळे पेमेंट अडकले? रिफंडसाठी फॉलो करा 'ही' पद्धत

IRCTC Down: तुमचेही पैसे अडकले असतील तर घाबरु नका. ते पैसे परत मिळवण्याची पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

IRCTC Down: रेल्वेचं तिकीट बुकिंग करताना तांत्रिक बिघाडामुळे पेमेंट अडकले? रिफंडसाठी फॉलो करा 'ही' पद्धत
IRCTC Down: दिवाळीसाठी रेल्वेनं गावी जाण्याचा प्लॅन करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसलाय.
मुंबई:

IRCTC Down: दिवाळीसाठी रेल्वेनं गावी जाण्याचा प्लॅन करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसलाय. . इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल ॲप अनेक तास ठप्प झाले होते. यामुळे हजारो प्रवाशांचे तिकीट बुकिंग रखडले आणि अनेकांचे पैसेमध्येच अडकून पडले. त्यामुळे हजारो युझर्स काळजीत पडले. तुमचेही पैसे अडकले असतील तर घाबरु नका. ते पैसे परत मिळवण्याची पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

नेमंक काय झालं होतं?

IRCTC ची सेवा ठप्प झाल्यानंतर युजर्सना लॉगइन करताना 'सर्वर अनअवेलेबल' (Server Unavailable) असा मेसेज दिसत होता. सोशल मीडियावर या अडचणीबद्दल अनेकांनी तक्रार केली.  वेबसाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म 'डाऊन डिटेक्टर'वरही 5,000 पेक्षा जास्त लोकांनी याची तक्रार नोंदवली होती. मात्र, काही तासांनंतर वेबसाइटवर लॉगइन सुरू झाले असले तरी, अजूनही काही युजर्सना तिकीट बुकिंगमध्ये अडचणी येत आहेत.

IRCTC सेवा ठप्प होण्याची कारणे काय?

IRCTC वेबसाइट आणि ॲप डाऊन होण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, दिवाळी आणि छठ पूजेच्या काळात लाखो प्रवासी एकाच वेळी 'तत्काळ तिकीट' बुकिंगसाठी लॉगइन करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे सर्व्हरवर प्रचंड ताण येऊन ती क्रॅश झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

( नक्की वाचा : Exclusive: रेल्वे प्रवाशांसाठी बंपर ऑफर; तिकीट रद्द न करता बदला तारीख, वाचा काय आहे प्रस्ताव? )
 

काळजी नको! अडकलेले पैसे 'असे' मिळवा परत

तिकीट बुकिंग करताना तुमचे पेमेंट कट झाले असेल आणि तिकीट बुक झाले नसेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. IRCTC अशा परिस्थितीत पेमेंट ऑटोमॅटिक (Automatic) परत करते.

ऑटोमॅटिक रिफंड: पेमेंट फेल झाल्यास, तुमचे पैसे 3 ते 5 व्यावसायिक दिवसांमध्ये (Working Days) आपोआप तुमच्या बँक खात्यात जमा होतात.

जास्तीत जास्त कालावधी: काही तांत्रिक अडचणींमुळे कधीकधी रिफंड येण्यास 21 दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.

वेळेत रिफंड न मिळाल्यास काय कराल?

निर्धारित वेळेत रिफंड मिळाला नाही, तर तुम्ही IRCTC शी संपर्क साधू शकता. यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा:

स्क्रीनशॉट घ्या: ट्रांझेक्शन फेल झाल्यावर त्वरित त्याचा स्क्रीनशॉट (Screenshot) घ्या.

ईमेल करा: हा स्क्रीनशॉट संलग्न (Attach) करून care@irctc.co.in या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवा.

कस्टमर केअर: तुम्ही IRCTC च्या कस्टमर केअर नंबरवरही संपर्क साधू शकता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com