ISRO ला मोठा धक्का, देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण EOS-09 सॅटेलाइटचं लॉन्चिंग अयशस्वी; कारण काय?

देशाच्या सुरक्षेसाठी हे सॅटेलाइट अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जात होतं. लॉन्चिंग अयशस्वी झाल्यामुळे त्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) EOS-09 सॅटेलाइटचं लॉन्चिंग अयशस्वी झालं आहे. ISRO कडून मिळालेल्या माहितीनुसार, PSLV  मध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे सॅटेलाइटचं लॉन्चिंग अयशस्वी झालं आहे. सॅटेलाइटमध्ये नेमकं काय अडचण आली याचा ISRO कडून शोध सुरू आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आम्ही लवकरच परतू...

EOS-09 सॅटेलाइटच्या अयशस्वी लॉन्चिंगनंतर ISRO प्रमुख म्हणाले की, नेमकी काय अडचण आली याचा तपास सुरू आहे. आम्ही लवकरच परतू. ते म्हणाले की, PSLV मध्ये दुसऱ्या स्तरानंतर गोंधळ निर्माण झाला होता. तोपर्यंत सर्वकाही ठीक होतं. 

नक्की वाचा - UPSC Calendar 2026: यूपीएससीनं प्रसिद्ध केलं 2026 चं कॅलेंडर, वाचा कधी होणार IAS, CDS, सह अन्य परीक्षा

EOS-09 मध्ये काय आहे खास?

EOS-09 सॅटेलाइट लॉन्च करण्यामागे देशाच्या रिमोट सेन्सिंग क्षमतांना अधिक बळकटी देण्याचा उद्देश आहे.  EOS-09 सॅटेलाइटला विशेषत: एन्टी टेररिस्ट ऑपरेशन, घुसखोरी किंवा संशयास्पद हालचालींचा शोध घेण्यासाठी डिजाइन करण्यात आलं होतं. या सॅटेलाइटच्या माध्यमातून ढगांच्या मागूनही फोटो काढण्याची आणि पृष्ठभागापर्यंत पाहण्याची क्षमता आहे.

Advertisement

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर अंतराळातून देशाच्या सुरक्षिततेसाठी हे सॅटेलाइट महत्त्वपूर्ण होतं. हा उपग्रह सर्व हवामान परिस्थिती, दाट ढग आणि कमी प्रकाशातही पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उच्च रिझोल्यूशन प्रतिमा कॅप्चर करण्यास सक्षम होतं. 

लॉन्चिंग अयशस्वी होण्यापूर्वी डब्ल्यू सेल्वामूर्तीने उपग्रहांच्या प्रेक्षपणासाठी ISRO चे वैज्ञानिक, तंत्रज्ञान आणि अंतरिक्ष संघटनांशी संबंधितांना शुभेच्छा दिल्या होत्या. उपग्रहाचं महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितलं की, EOS-09 हा उपग्रहांच्या समूहाचा एक भाग आहे जो शेती, वनीकरण, आपत्ती व्यवस्थापन किंवा अगदी धोरणात्मक आणि लष्करी प्रयोगांमध्ये वापरला जाऊ शकतो.

Advertisement