जाहिरात

मिलिट्री ग्रेड सर्टिफिकेट , नेटवर्क नसलं तरीही बोलता येणार; किंमत ऐकाल तर दुकानाकडे धावत सुटाल

itel A100 Mobile Features: या स्मार्टफोनचे दुसरे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 'अल्ट्रालिंक' (UltraLink) हे खास तंत्रज्ञान.

मिलिट्री ग्रेड सर्टिफिकेट , नेटवर्क नसलं तरीही बोलता येणार; किंमत ऐकाल तर दुकानाकडे धावत सुटाल
मुंबई:

भारतातील प्रसिद्ध टेक ब्रँड 'आयटेल' (itel) ने आपला नवा आणि स्टायलिश 'ए100' (A100) स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन दिसायला जितका सुंदर आहे, तितकाच तो वापरायला मजबूत आहे. या फोनला 'मिलिटरी ग्रेड' सर्टिफिकेट मिळाले आहे, याचाच अर्थ हा फोन खूप टिकाऊ आहे आणि लवकर खराब होणार नाही.

दोन व्हेरीएंटमध्ये फोन उपलब्ध

हा स्मार्टफोन दोन प्रकारात उपलब्ध आहे. 3GB रॅम असलेल्या फोनची किंमत 6799 रुपये आहे, तर 4GB रॅम असलेल्या फोनची किंमत 7499 रुपये आहे. विशेष म्हणजे, हा फोन खरेदी केल्यानंतर 100 दिवसांच्या आत जर स्क्रीन फुटली, तर कंपनी ती मोफत बदलून देणार आहे.

तुटणार नाही फुटणार नाही आणि पाण्यात भिजणारही नाही

आयटेल (itel) कंपनीचा 'A100' स्मार्टफोन बाजारात आला असून हा फोन अत्यंत मजबूत असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.  अवघ्या 7000 ते 8000 रुपयांच्या बजेटमध्ये असलेला हा फोन 'मिलिटरी ग्रेड' प्रमाणपत्रासह येतो. याचा अर्थ असा की, हा फोन साधारण 2.5 ते 4 फूट उंचीवरून 26 वेळा जमिनीवर पडला, तरी त्याचा साधा टवकाही उडणार नाही. याशिवाय फोनला धूळ आणि पाण्यापासून वाचवण्यासाठी 'IP54' रेटिंग देण्यात आले आहे, ज्यामुळे तो पटकन खराब होत नाही आणि पावसामध्ये विनाव्यत्यय वापरणंही सोपं जातं.  

नक्की वाचा: तुम्ही घर बसल्या आजार तर मागवित नाही ना? Food delivery app बाबत डॉक्टरांचा मोठा खुलासा

नेटवर्कशिवायही मारू शकता गप्पा

या स्मार्टफोनचे दुसरे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 'अल्ट्रालिंक' (UltraLink) हे खास तंत्रज्ञान. या फीचरमुळे दोन आयटेल फोन वापरकर्ते मोबाईल नेटवर्क किंवा रिचार्जशिवाय एकमेकांशी मोफत बोलू शकतात. हे तंत्रज्ञान ब्लूटूथवर आधारित असून साधारण 0.1 किलोमीटर (म्हणजेच 100 मीटर) पर्यंतच्या अंतरावर विनामूल्य कॉल आणि मेसेज करण्याची सुविधा देतं. ज्या ठिकाणी मोबाईलचे नेटवर्क नसते किंवा सिमकार्डमध्ये बॅलन्स नसतो, अशा वेळी जवळच्या अंतरावर असलेल्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी हे फिचर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

नक्की वाचा: स्वप्नात पैसे दिसतात? श्रीमंत होण्याचं लक्षण? जाणून घ्या काय होतो याचा अर्थ

काय आहे फोनची आणखी काही फिचर्स ?

  1. या मोबाईलमध्ये 'अल्ट्रालिंक' सुविधा आहे, ज्यामुळे नेटवर्क कमी असलेल्या ठिकाणीही फोन नीट चालतो.
  2. मोठा डिस्प्ले: फोनमध्ये 6.6 इंचाचा मोठा स्क्रीन आहे, ज्यामुळे व्हिडिओ पाहण्याचा आनंद वाढतो.
  3. यात 5000 mAh ची मोठी बॅटरी आहे, जी दिवसभर टिकते.
  4. फोनमध्ये 'आयआर ब्लास्टर' आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही टीव्ही किंवा एसी कंट्रोल करू शकता.
  5. कॅमेरा आणि सुरक्षा: फोटोसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तसेच सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा दिली आहे.
  6. हा फोन सिल्क ग्रीन, प्युअर ब्लॅक आणि टायटॅनियम गोल्ड अशा तीन आकर्षक रंगांमध्ये सर्व मोबाईल दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com