Viral VIDEO: समोसा विक्रेत्याचा माज! UPI पेमेंट फेल झाल्याने प्रवाशाला मारहाण, घड्याळही घेतलं

Viral VIDEO: समोसे विकणाऱ्या विक्रेत्याचा आणि एका प्रवाशाचा वाद डिजिटल पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे इतका वाढला की विक्रेत्याने प्रवाशासोबत हाणामारी सुरू केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Jabalpur railway station Viral VIDEO
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • Passenger and samosa vendor scuffle over failed digital payment at Jabalpur station
  • Passenger offers smartwatch to settle dispute after vendor demands money aggressively
  • Railway Protection Force detains the vendor following the viral video incident
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

मध्य प्रदेशमधील जबलपूर रेल्वे स्टेशनवर डिजिटल पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे एका प्रवाशाला समोसे विक्रेत्याकडून मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करत त्या विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता जबलपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर एक अनपेक्षित घटना घडली. समोसे विकणाऱ्या विक्रेत्याचा आणि एका प्रवाशाचा वाद डिजिटल पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे इतका वाढला की विक्रेत्याने प्रवाशासोबत हाणामारी सुरू केली.

पाहा Video 

व्हिडिओमध्ये काय दिसले?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, एका प्रवाशाने ट्रेनमधून उतरून समोसे खरेदी केले आणि UPI द्वारे पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण ट्रान्झॅक्शन झाले नाही. दरम्यान, ट्रेन सुरू झाली, तेव्हा प्रवाशाने समोसे परत केले आणि पुन्हा ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या विक्रेत्याने त्याला थांबवले, कॉलर पकडली आणि पैशांची मागणी केली.

व्हिडिओमध्ये प्रवासी घाबरलेला दिसत आहे आणि तो अयशस्वी झालेल्या ट्रान्झॅक्शनची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रेन सुटण्याची भीती असल्याने, त्याने आपले स्मार्टवॉच काढून विक्रेत्याला दिले. त्यानंतर विक्रेत्याने त्याला दोन प्लेट समोसे देऊन त्याला जाऊ दिले.

Advertisement

रेल्वे प्रशासनाची तातडीची कारवाई

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, रेल्वे प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घेतली. मंडळ रेल्वे व्यवस्थापक (DRM), जबलपूर यांनी माहिती दिली की, विक्रेत्याची ओळख पटली असून, RPF ने त्याला ताब्यात घेतले आहे. यासोबतच, संबंधित परवानाधारकाचा परवाना रद्द करण्याची कारवाईही केली जात आहे.