Jagdeep Dhankhar:अखेर जगदीप धनखड यांनी 40 दिवसानंतर सोडले उपराष्ट्रपती निवासस्थान, 'हा' आहे नवीन पत्ता

त्यांना अद्याप सरकारी बंगला वाटप करण्यात आलेला नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर 40 दिवसांनी उपराष्ट्रपती निवासस्थान सोडले आहे. आता ते छतरपूरच्या गदाईपूर येथे एका खाजगी घरात स्थलांतरित झाले आहेत. ही एक तात्पुरती व्यवस्था आहे. सरकार त्यांना टाइप आठ बंगला वाटप करेल तेव्हा ते तिथे शिफ्ट होतील. जगदीप धनखड यांना 34 एपीजे अब्दुल कलाम रोड येथील बंगला वाटप झाला आहे. परंतु तो तयार होण्यास अजून तीन महिने लागतील. तोपर्यंत धनखड छतरपूरमध्ये राहतील. हे अभय चौटालांचे फार्महाऊस आहे.

सूत्रांनुसार, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सरकारी निवासासाठी नगर विकास मंत्रालयाला नियमानुसार, माजी उपराष्ट्रपतींना मिळणाऱ्या सरकारी बंगल्यासाठी पत्र लिहिले आहे. सूत्रांनुसार, त्यांना अद्याप सरकारी बंगला वाटप करण्यात आलेला नाही. जोपर्यंत त्यांना सरकारी बंगला मिळत नाही, तोपर्यंत ते छतरपूरच्या फार्महाऊसमध्ये राहतील. नगर विकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील डायरेक्टरेट ऑफ इस्टेटने माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासाठी 34 एपीजे अब्दुल कलाम मार्ग येथील टाइप 8 चा बंगला रिकामा केला आहे.

नक्की वाचा - Mumbai Maratha Reservation Protest: CSMT स्टेशनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना काढा, हायकोर्टाचे निर्देश

दुसरीबाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच माजी उपराष्ट्रपती धनखड यांनी राजस्थानमध्ये माजी आमदार म्हणून पेन्शनसाठी अर्ज केला होता. धनखड 1993 ते 1998 पर्यंत किशनगड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. त्यांनी जुलै 2019 पर्यंत माजी आमदार म्हणून पेन्शन घेतली होती. धनखड यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यावर ही पेन्शन थांबवण्यात आली होती. अधिकार्यांनी सांगितले की, 21 जुलै रोजी उपराष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यानंतर, धनखड यांनी माजी आमदार म्हणून पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी राजस्थान विधानसभा सचिवालयात नव्याने अर्ज केला आहे. 

Manoj Jarange Patil Mumbai Maratha Protest: महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन, राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल

सचिवालयाने या अर्जावर प्रक्रिया सुरू केली असून त्यांची पेन्शन उपराष्ट्रपती पदाच्या त्यांच्या राजीनाम्याच्या तारखेपासून लागू होईल. राजस्थानमध्ये माजी आमदाराची पेन्शन एका कार्यकाळासाठी दरमहा 35,000 रुपयांपासून सुरू होते.  अतिरिक्त कार्यकाळ आणि वयानुसार ती वाढत जाते. 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना 20 टक्के वाढीचा फायदा मिळतो. अधिकार्यांच्या मते, धनखड 74 वर्षांचे आहेत. माजी आमदार म्हणून त्यांना दरमहा 42,000 रुपयांची पेन्शन मिळेल असे ही त्यांनी सांगितले आहे. 

Advertisement