उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्य कारणांचं कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू असताना हा राजीनामा समोर आला आहे. या घटनाक्रमानंतर लोकांच्या मनात पुढचे उपराष्ट्रपती कोण असतील याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. पुढील उपराष्ट्रपती कोण असतील आणि भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी असते याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
भारताच्या उपराष्ट्रपतीचं पद संविधानिकपणे महत्त्वपूर्ण आहे. त्यात उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. सोबतच राष्ट्रपतीपद कोणत्याही कारणास्तव रिक्त झालं, तर उपराष्ट्रपती त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. उपराष्ट्रपतीची निवड लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व खासदारांद्वारे केली जाते, ज्यामध्ये राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य देखील समाविष्ट असतात.
उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक - प्रक्रिया आणि योग्यता
- भारताचे नागरिक असावेत
- कमीत कमी ३५ वर्षांचे असावेत
- राज्यसभेचे सदस्य निवड योग्यता
मतदार आणि मतदान प्रक्रिया...
लोकसभेचे ५४३ सदस्य आणि राज्यसभेचे २४५ सदस्य, ज्यात १२ मनोनित सदस्यांचा सहभाग आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान करतात.
उमेदवाराला १५,००० रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम जमा करावी लागते, जर त्याला १/६ मते मिळाली नाहीत तर ती जप्त होते.
प्रत्येक खासदार एक मत देतो आणि प्राथमिकतेच्या आधाकाव उमेदवारांना १, २, ३... च्या क्रमात दर्शविला जातो. मतदानात सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीमचा उपयोग केला जातो. ज्यात मतदार आपल्या आवडीनुसार उमेदवारांना रँक देतो.
मतदान प्रक्रियेत, मतदार त्यांच्या पसंतीनुसार उमेदवारांना प्राधान्य देतात. उदाहरणार्थ, जर तीन उमेदवार अ, ब आणि क असतील, तर मतदार त्याच्या मतपत्रिकेवर त्याची पसंती खालीलप्रमाणे दर्शवू शकतो.
A च्या समोर 1 लिहून त्याची पहिली पसंती दाखवू शकतो.
B च्या समोर 2 लिहून त्याची दुसरी पसंती दाखवू शकतो.
C च्या पुढे 3 लिहून त्याची तिसरी पसंती दाखवू शकतो.
निवडणुकीची प्रक्रिया....
- उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते
- नामांकन पत्रांची छाननी केल्यानंतर, वैध उमेदवारांची यादी तयार केली जाते
- मतदानाच्या दिवशी, खासदार त्यांच्या मतपत्रिकेवर उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार क्रमवारी लावतात.
- मतमोजणीनंतर उमेदवारांना त्यांच्या प्राथमिकतेनुसार मत विभागणी केली जाते
- ज्या उमेदवाराला ठरावित कोटा पूर्ण करण्यासाठी पुरेशी मतं मिळतात, त्यांची राष्ट्रपती पदासाठी निवडले जाते.
प्रारंभिक आयुष्य आणि शिक्षण...
जगदीप धनखड यांचा जन्म १८ मे १९५१ साली राजस्थानातील झुंझून जिल्ग्यातील किठाना गावातील एका जाट शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण गावात घेतलं. त्यानंतर सैनिकी शाळा चित्तोडगडमध्ये शिक्षण घेतलं. यानंतर जयपूरच्या महाराजा कॉलेजमधून भौतिकी विषयात पदवी घेतली आणि १९७९ मध्ये राजस्थान विद्यापीठातून विधीचं शिक्षण घेतलं. त्याच वर्षी त्यांनी वकिली सुरू केली आणि १९९० मध्ये राजस्थान उच्च न्यायालयातून त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले. ते सर्वोच्च न्यायालय आणि देशातील अनेक उच्च न्यायालयांमध्ये सक्रिय वकील होते.
राजकीय करिअर...
धनखडने १९८९ मध्ये जनता दलाच्या तिकीटावर झुंझूनमधून लोकसभा निवडणूक जिंकलं आणि संसदेत पोहोचले. १९९० मध्ये त्यांनी चंद्रशेखर सरकारमध्ये संसदेत कार्य राज्यमंत्री झाले. १९९१ मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले आणि अजमेरमधून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र अपयशी झाले. १९९३ मध्ये ते किशनगड विधानसभा जागेवरुन आमदार निवडून आले. १९९८ मध्ये त्यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावलं, मात्र यश मिळू शकलं नाही.