Republic Day Rada : 'जिलबी'वरुन पंचायतीत राडा; विटा-दगड घेऊन गावकरी रस्त्यावर, जीव मुठीत धरून सरपंच पळाले!

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर गोडाचं वाटप करण्यासाठी १ क्विंटल जिलबी आणली होती. नेमकं त्याचवेळी हा राडा झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • बिहार के जहानाबाद जिले के गोनवां पंचायत भवन में गणतंत्र दिवस समारोह के बाद जलेबी को लेकर विवाद हुआ
  • पंचायत मुखिया अमरनाथ सिंह ने समारोह में एक क्विंटल जलेबी की व्यवस्था की थी, जिसे कुछ लोग चुराने लगे
  • जलेबी चोरी को रोकने के प्रयास के दौरान मुखिया के समर्थकों और अन्य लोगों के बीच लाठी-डंडे से हिंसक झड़प हुई
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
जहानाबाद:

Republic Day 2026 Rada : २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका छोट्याशा गोष्टीमुळे गावात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बिहारमधील जहानाबाद येथे घडली आहे. या गावात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर वाटप केल्या जाणाऱ्या 'जिलबी' वरुन भांडण झालं. पुढे हा वाद इतका वाढला की, लाठी हल्ले करण्यात आले. चार गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. इतकच नाही ज्या पंचायत भवनात हा सर्व राडा सुरू होतो, त्याच्या सरपंचांना जीव मुठीत धरून पळ काढावा लागला. 

ही घटना बिहारमधील पसरबिगहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंचायतीचे सरपंच अमरनाथ सिंह यांनी पंचायत भवनात ध्वजारोहण केलं. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सरपंचांकडून एक क्विंटल जिलबीची व्यवस्था करण्यात आली होती. यादरम्यान पंचायतीचे काही लोक जिलबी घेऊन पळून जात होते, त्यानंतर हा सर्व राडा झाला. 

नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर गोडाचं वाटप करण्यासाठी १ क्विंटल जिलबी आणली होती. ध्वजारोहण झाल्यानंतर काही लोक जिलबी घेऊन पळू लागले. जेव्हा सरपंचांच्या लोकांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला तर प्रकरण चिघळलं. यानंतर गावातील काही लोकांनी लाठीचार केला आणि काही लोक तर विटा-दगड घेऊन एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यानंतर प्रकरण इतकं टोकाला गेलं की सरपंच साहेबांनी जीव मुठीत धरून पळ काढला. 
 

नक्की वाचा - Satara News : गुजरातच्या बड्या अधिकाऱ्यांची साताऱ्यात मोठी कारवाई; 60 कोटींचा एमडी साठा जप्त

चार गाड्यांच्या काचा फोडल्या...

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, गावकरी एकमेकांविरोधात दगड-विटा घेऊन उभे आहेत. या हिंसाचारात पंचायत भवनात उभ्या असलेल्या चार गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. सरपंच अमरनाथ सिंह यांनी आरोप केला आहे की, ध्वजारोहण झाल्यानंतर जिलबीवरुन झालेल्या वादात त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. 
 

Advertisement