Jeet Adani : उद्योजक गौतम अदाणी यांचे कनिष्ठ चिरंजीव जीत अदाणी यांचे 7 फेब्रुवारी रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये लग्न होणार आहे. या लग्नापूर्वी अदाणी समुहानं दिव्यांग विवाहित महिलांना मदत करण्यासाठी 'मंगल सेवा' अभियान सुरु केलं आहे. या अभियानाच्या अंतर्गत दरवर्षी 500 दिव्यांग महिलांना 10 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.
जीत अदाणी यांनी या मंगल सेवा अभियानाच्या अंतर्गत 21 नवविवाहित दिव्यांग महिला आणि त्यांच्या पतीची भेट घेतली. नव्या पिढीतील उद्योजक असलेल्या जीत अदाणी यांनी या कार्याच्या माध्यमातून सामाजिक भान जपलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गौतम अदाणी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जीत आणि त्यांची होणारी सून दिवा शाह यांच्या पुण्य संकल्पाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, दोघांनी वैवाहिक आयुष्य सुरु करण्यापूर्वी 'मंगल सेवा' करण्याचा संकल्प केला आहे. त्या माध्यमातून जीत आणि दीवा दरवर्षी 500 दिव्यांग बहिणींच्या लग्नासाठी प्रत्येकी 10 लाखांची मदत करतील. गौतम अदाणी यांनी सांगितलं की, एक वडिल म्हणून ही 'मंगल सेवा' त्यांच्यासाठी आनंद आणि भाग्याची गोष्ट आहे.
जीत अदाणी हे सध्या अदाणी एअरपोर्ट होर्डिंग्सचे संचालक आहेत. ही देशातील सर्वात मोठी मोठी विमानतळ पायाभूत सुविधा कंपनी असून त्या कंपनीच्या अंतर्गत आठ विमानतळांचे व्यवस्थापन आणि विकास करण्यात येत आहे. विमानतळ व्यवसायाव्यतिरिक्त, ते अदाणी समूहाच्या संरक्षण, पेट्रोकेमिकल्स आणि तांबे व्यवसायांमध्येही सक्रीय आहेत. तसंच ते अदाणी समुहाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचाही प्रभारी आहेत.
( नक्की वाचा : Jeet Adani Wedding : जीत अदाणी यांनी लग्नापूर्वी जपलं सामाजिक भान, दिव्यांग बहिणींना केली मोलाची मदत )
जीत अदाणी यांनी या मंगल सेवेचा संकल्प त्यांच्या आई डॉक्टर प्रीती अदाणी यांच्यपासून प्रेरणा घेत केला आहे. डॉक्टर प्रीती अदाणी यांनी अदाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून मुंद्रामधील एका लहान ग्रामीण प्रकल्पाचं एका जागतिक परोपकारी संस्थेमध्ये रुपांतर केलं आहे. जीत अदाणी यांचा भर दिव्यांगांची मदत करण्याबरोबरच परोपकारी कार्य करण्यावर आहे