![Jeet Adani Wedding : जीत अदाणी यांनी लग्नापूर्वी जपलं सामाजिक भान, दिव्यांग बहिणींना केली मोलाची मदत Jeet Adani Wedding : जीत अदाणी यांनी लग्नापूर्वी जपलं सामाजिक भान, दिव्यांग बहिणींना केली मोलाची मदत](https://c.ndtvimg.com/2025-02/l838v4mo_jeet-adani_625x300_05_February_25.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
Jeet Adani Wedding : अदाणी एयरपोर्ट्सचे (Adani Airport Holdings Ltd.) संचालक जीत अदाणी (Jeet Adani) यांचं 7 फेब्रुवारी रोजी दिवा शाह (Diva Shah) यांच्याशी लग्न होणार आहे. या लग्नाच्या दोन दिवस आधी जीत यांनी सामाजिक भान जपत सर्वांसमोर नवा आदर्श घालून दिला आहे.
अदाणी उद्योगसमुहाचे संचालक गौतम अदाणी (Gautam Adani) यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. गौतम अदाणी यांनी या ट्विटमध्ये त्यांचा मुलगा जीत अदाणी यांच्या कामाची प्रशंसा केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'माझा मुलगा जीत आणि सून दिवा यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात एका पुण्य संकल्पानं केली आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. जीत आणि दिवा यांनी दरवर्षी 500 दिव्यांग बहिणींच्या लग्नात प्रत्येक बहिणींना 10 लाखांची आर्थिक मदत करण्याचा 'मंगल सेवा' संकल्प केला आहे.
एक वडिल म्हणून माझ्यासाठी ही 'मंगल सेवा' अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आहे. या विधायक प्रयत्नांमुळे अनेक दिव्यांग मुली आणि त्यांच्या कुटुंबांच्या आयुष्यात सुख, शांती आणि सन्मान वाढेल असा मला पूर्ण विश्वास आहे.
माझी देवाकडं प्रार्थना आहे की, त्यांनी जीत आणि दिवाला या सेवा मार्गावर निरंतर पुढं जाण्यासाठी आशीर्वाद आणि सामर्थ्य द्यावं', अशी भावना गौतम अदाणी यांनी व्यक्त केली आहे.
यह अत्यंत हर्ष का विषय है कि मेरा बेटा जीत और बहू दिवा अपने वैवाहिक जीवन की शुरुआत एक पुण्य संकल्प से कर रहे हैं।
— Gautam Adani (@gautam_adani) February 5, 2025
जीत और दिवा ने प्रति वर्ष 500 दिव्यांग बहनों के विवाह में प्रत्येक बहन के लिए 10 लाख का आर्थिक सहयोग कर ‘मंगल सेवा' का संकल्प लिया है।
एक पिता के रूप में यह ‘मंगल… pic.twitter.com/tKuW2zPCUE
जीत अदाणी हे सध्या अदाणी एअरपोर्ट होर्डिंग्सचे संचालक आहेत. ही देशातील सर्वात मोठी मोठी विमानतळ पायाभूत सुविधा कंपनी असून त्या कंपनीच्या अंतर्गत आठ विमानतळांचे व्यवस्थापन आणि विकास करण्यात येत आहे. विमानतळ व्यवसायाव्यतिरिक्त, ते अदाणी समूहाच्या संरक्षण, पेट्रोकेमिकल्स आणि तांबे व्यवसायांमध्येही सक्रीय आहेत. तसंच ते अदाणी समुहाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचाही प्रभारी आहेत.
( नक्की वाचा : Jeet Adani Wedding : जीत अदाणींच्या लग्नात सेलिब्रेटींचा महाकुंभ? गौतम अदाणी यांनी दिलं सर्व चर्चांना उत्तर )
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world