IRS भाऊ, सनदी अधिकारी बहीण आणि आईचा संशयास्पद मृत्यू; घरात आढळले मृतावस्थेत

शालिनी झारखंड समाज कल्याण विभागात सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत होत्या. पण त्या 2020 पासून रजेवर होत्या. मूळचे झारखंडचे असलेले हे कुटुंब केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील कक्कनड कस्टम्स क्वार्टर्समध्ये राहत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

झारखंड लोकसेवा आयोगाच्या (JPSC) पहिल्या परीक्षेत टॉपर राहिलेल्या शालिनी विजय, त्यांचा भाऊ IRS अधिकारी मनीष विजय आणि आई शकुंतला अग्रवाल मृतावस्थेत आढळले आहेत. या तिघांचे मृतदेह कोची येथील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त मनीष यांच्या सरकारी निवासस्थानातून सापडले.

शालिनी झारखंड समाज कल्याण विभागात सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत होत्या. पण त्या 2020 पासून रजेवर होत्या. मूळचे झारखंडचे असलेले हे कुटुंब केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील कक्कनड कस्टम्स क्वार्टर्समध्ये राहत होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शालिनी विजय यांनी 2006 मध्ये जेपीएससी परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला होता. त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली. मात्र नंतर त्याच्या पदाला आव्हान देण्यात आले. 2024 मध्ये या प्रकरणाशी संबंधित आरोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याची कार्यवाही सुरू होती. शालिनी या केसबद्दल चिंतेत होती.

IRS मनीष यांनी चार दिवसांची सुट्टी घेतली होती. मात्र चार दिवसांच्या रजेनंतरही मनीष विजय कामावर परतले नाहीत. त्यानंतर त्यांचा एक सहकारी घरी गेला. घराबाहेर पोहोचल्यानंतर तिथे प्रचंड दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्याने पोलिसांना तात्काळ याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष आणि शालिनीचे मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळले. तर त्यांची आई शकुंतला बेडवर मृतावस्थेत आढळली. 

Advertisement

(नक्की वाचा-  Chhaava : छावा चित्रपटावर शिर्के कुटुंबीय आक्रमक, दिग्दर्शकाला राज्यात फिरु न देण्याचा इशारा)

पोलिसांना शकुंतला यांचा मृतदेह पांढऱ्या कापडात गुंडाळलेला आणि शेजारी फुले ठेवलेली आढळली. आईचा मृत्यू झाला असावा किंवा त्यांचा खून झाला असावा आणि नंतर भाऊ आणि बहिणीने आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे.पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. 

(नक्की वाचा- कुणी निवृत्त PSI तर कुणी फाड-फाड इंग्रजी बोलतंय; शिर्डीत 80 भिकाऱ्यांची धरपकड)

पोलिसांना खोलीतून डायरी सापडली

कोचीचे पोलीस आयुक्त पुट्टा विमलादित्य यांनी NDTV ला सांगितले की, मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. फॉरेन्सिक तपासणीनंतरच त्याचा मृत्यू कधी झाला हे सांगता येईल. पोलिसांना एका खोलीत एक डायरी देखील सापडली, ज्यामध्ये एक चिठ्ठी लिहिलेली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की परदेशात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीला मृत्यूची माहिती देण्यात यावी. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालिनी या झारखंडमधील एका कायदेशीर प्रकरणामुळे त्रस्त होत्या. मनीष यांनी याच केससाठी कामावरून रजा घेतली होती.

Advertisement

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)