JNU मध्ये शिवरायांच्या युद्धनीतीवर धडे, 24 जुलैला उद्घाटन, अभ्यासक्रमाची सुरुवात कधीपासून?

छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘हिंदवी स्वराज’ अखंड भारताचा कालावधी शिकवला जाईल.

जाहिरात
Read Time: 2 mins

देशातील नामांकित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात (JNU University) पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू होणार आहे. महाराष्ट्रासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अध्यासन केंद्राचे उद्घाटन होणार असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 24 जुलैला दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि  ‘कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्रा'चं उद्घाटन करणार असल्याची माहिती आहे  

येत्या 24 जुलैला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहेत. गेल्या 16 वर्षापासून दोन्ही अध्यासनं रखडली होती. अखेर दोन्ही केंद्राचं उद्घाटन निश्चित झालं आहे. 

नक्की वाचा - SBI CBO Recruitment 2025: मराठी तरुणांना सुवर्ण संधी; पगार अनुभव आणि पात्रतेचे निकष काय? वाचा एका क्लिकवर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीवर जेएनयूमध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून संशोधन सुरू होत आहे. या संदर्भात स्कूल ऑफ इंटरनेशनल स्टडीजने एक योजना तयार केली आहे. यासंदर्भात अनेक विशेष तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. सेंटर ऑफ ईस्ट एशियन स्टडीजचे प्राध्यापक अरविंद वेल्लारी आणि सेंटर ऑफ युरोपियन स्टडीजचे डॉ जगन्नाथन यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘हिंदवी स्वराज' अखंड भारताचा कालावधी शिकवला जाईल.

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याचा अभ्यास केला जाणार

- मराठा मिल्ट्री हिस्ट्री
- नौदल रणनीती, 
- गोरिल्ला युद्धनीती

या तिन्ही विषय शिकवले जाणार. यात सुरक्षा रचना आणि व्यूहरचनेचा समावेश असेल. यासाठी महाराष्ट्र सरकार मदत करणार आहेत. हे केंद्र डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहेत.