Finance Sector Job : देशात 18 लाख नोकऱ्या उपलब्ध, मात्र योग्य उमेदवारच नाहीत

FPSB इंडियाच्या कृष्ण मिश्रा यांनी म्हटलं की, नॅशलन करिअर सर्व्हिसेस पोर्टलवरील डेटानुसार मागील वर्षी देशात फायनान्शियल सर्व्हिस सेक्टरमध्ये 46.86 नोकऱ्या उपलब्ध होत्या. मात्र त्यापैकी केवळ 27.5 लाख जागा भरल्या गेल्या.

Advertisement
Read Time: 2 mins

देशभरात बेरोजगारीबाबत ओरड सुरु असताना एक चकीत करणारी माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, फायनान्स सेक्टरमध्ये 18 लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत, मात्र त्या नोकऱ्यांसाठी मनुष्यबळच उपलब्ध नाही. फायनान्शियल प्लानिंग स्टॅण्डर्ड बोर्ड (FPSB) इंडियाचे सीईओ कृष्ण मिश्रा यांनी अशी माहिती दिली आहे.  

देशात नोकऱ्या आहेत मात्र त्या नोकऱ्या करण्यासाठी सक्षम लोक नाहीत. जवळपास 18 लाख नोकऱ्या उपलब्ध असताना त्या नोकऱ्या करण्यासाठी त्या योग्य लोक नाहीत. न्यूज एजन्सी PTI सोबत बोलताना कृष्ण मिश्रा यांनी केंद्र सरकारच्या नॅशनल करिअर सर्व्हिसेस पोर्टलवरील माहितीचा आधार घेत ही माहिती दिली. 

FPSB इंडियाच्या कृष्ण मिश्रा यांनी म्हटलं की, नॅशलन करिअर सर्व्हिसेस पोर्टलवरील डेटानुसार मागील वर्षी देशात फायनान्शियल सर्व्हिस सेक्टरमध्ये 46.86 नोकऱ्या उपलब्ध होत्या. मात्र त्यापैकी केवळ 27.5 लाख जागा भरल्या गेल्या. तर जवळपास 18 लाख जागा तशाच रिक्त आहेत. 

यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी क्षमता किंवा स्कील नसल्याचं कारण समोर आलं आहे. बँक, विमा कंपन्या, ब्रोकरेज हाऊस आणि म्युच्युअल फंड कंपन्यांना नेहमीच प्रशिक्षित उमेदवारांची गरज असते. त्यामुळे नोकऱ्या असून देखील त्या नोकऱ्या स्वीकारण्यासाठी त्या क्षमतेचे लोक नाहीत, असं कृष्ण मिश्रा यांनी म्हटलं. 

Advertisement

गांधीनगरमधील गिफ्ट सिटीमध्ये पुढील पाच वर्षात दीड लाखांहून अधिक नोकऱ्यांची उपलब्ध होणार आहेत. या नोकऱ्या सर्वाधिक वितरण आणि व्यवस्थापन क्षेत्रात आहेत. यासाठी सर्टिफाईड फायनान्शियल प्लानर्स अर्थात तज्ज्ञ वित्त व्यवस्थापकांची मागणी जास्त असणार आहे. ऑनलाईन नोकऱ्यांमध्ये देखील सर्टिफाईड फायनान्शियल प्लानर्सची संख्या खूपच कमी दिसून येते, असं कृष्ण मिश्रा यांनी म्हटलं. 

Advertisement

कृष्ण मिश्रा यांच्या बोलण्याचा अर्थ काय?

  1. देशात सर्टिफाईड फायनान्शियल प्लानर्स (CFP) जेवढी संख्या आहे, त्यापेक्षा 40 टक्के जास्त नोकऱ्या उपलब्ध आहेत. 
  2. भारतात 2731 सर्टिफाईड फायनान्शियल प्लानर्स प्रोफेशनल्स आहेत. तर जगभरात ही संख्या 2.23 लाख एवढी आहे. 
  3. देशात 2030 पर्यंत जवळपास 10 हजार सर्टिफाईड फायनान्शियल प्लानर्स प्रोफेशनल्स असतील. तर त्यांची मागणी 1 लाखांहून जास्त असेल. 
  4. गांधीनगरच्या गिफ्ट सिटीमध्ये पुढील पाच वर्षात दीड नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या येथे फायनान्स सेक्टरमध्ये केवळ 6000 कर्मचारी आहेत. 

'पर्सनल फायनान्स'कडे दुर्लक्ष

कृष्ण मिश्रा यांनी म्हटलं की, भारतात पर्सनल फायनान्सकडे दुर्लक्ष केलं जातं. केवळ श्रीमंत लोकांना याची गरज पडते असा समज लोकांमध्ये आहे. मात्र पैशांचं व्यवस्थापन ही आज सर्वाचीच गरज आहे. त्यामुळे आर्थिक साक्षरता यापुढे गरजेची असणार आहे. 

IIM आणि FPSB सुरु करणार ट्रेनिंग प्रोग्राम

एफपीएसबीचे सीईओंनी म्हटलं की, प्रोफेशनल्ससाठी लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच सुरू केला जाईल. 'FPSB India आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद यांनी मंगळवारी आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक सल्लागार सेवांमधील प्रोफेशनल्ससाठी क्षमता निर्माण उपक्रमांतर्गत एक सीरिज सुरू करण्यासाठी करार केला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article