Martyr Surendra Moga: "वडिलांच्या हौतात्म्याचा बदला घेईन", शहीद वडिलांना निरोप देताना 11 वर्षांच्या मुलीचे उद्गार

Shahid Surendra Moga : सामान्य लोकांपासून ते राज्यातील वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी आणि लष्करी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण सुरेंद्र कुमार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Shahid Surendra Moga : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात राजस्थानचे जवान सुरेंद्र कुमार मोगा शहीद झाले. उधमपूरमध्ये सुरेंद्र मोगा तैनात होते. सुरेंद्र मोगा हे लष्कराच्या मेडिकल युनिटमध्ये सेवा देत होते. सुरेंद्र कुमार यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी मेहरादसी येथे पोहोचले तेव्हा प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.

सामान्य लोकांपासून ते राज्यातील वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी आणि लष्करी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण सुरेंद्र कुमार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले होते. जयपूरच्या लष्करी तुकडीनेही शहीद सुरेंद्र यांना मानवंदना दिली. सुरेंद्र यांची पत्नी आणि मुलांचं दु:ख काळीज पिळवटून टाकणारं होतं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शहीद जवान सुरेंद्र यांच्या सात वर्षांचा मुलगा दक्ष याने चितेला अग्नी दिला. त्यावेळी 11 वर्षांची मुलगी वर्तिका तिरंगा हातात धरून मोठ्या धाडसाने म्हणाली की, "मी मोठी होऊन सैन्यात भरती होईन आणि माझ्या वडिलांच्या हौतात्म्याचा बदला घेईन. पाकिस्तान नष्ट झाला पाहिजे." वर्तिकाचे उद्गार ऐकून अनेकांचा उर अभिमानाने भरून आला, मात्र डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. 

(नक्की वाचा - India Pakistan Tension: राहुल गांधींची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी, मोदी निर्णय घेणार?)

शहीद सुरेंद्र कुमार यांची पत्नी सीमा देवी यांची स्थिती पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. सुरेंद्र कुमार यांचा गणवेश सीमा देवी यांना हवाई दलाने दिला तेव्हा त्यांनी तो प्रथम कपाळाला आणि नंतर हृदयाला स्पर्श केला आणि रडू लागल्या. "एकदा तरी उठ" ही आर्त हाक हृदय पिळवटून टाकणारी होती.

Advertisement

हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन विनय भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली लष्कर आणि पोलिसांच्या तुकडीने शहीद सुरेंद्र कुमार मोगा यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन अंतिम निरोप दिला. शहीद सुरेंद्र कुमार यांचे पार्थिव लष्करी सन्मानाने पंचत्वात विलीन करण्यात आले.

Topics mentioned in this article