न्यायमूर्ती दुप्पला वेंकट रमणा यांनी 2 जून रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयातून निवृत्त होताना एक मोठा खुलासा केला आहे. विनाकारण केलेल्या बदलीमुळे त्यांना आपल्या आजारी पत्नीची काळजीही घेता येत नव्हती. त्यांनी याबाबत विनंती अर्जही केला होता. मात्र त्यांच्याबाबत संवेदनशीलता जपण्यात आली नाही. न्यायमूर्ती रमणा यांनी मंगळवारी आपल्या निरोपाच्या भाषणात मोठी खंत व्यक्त केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कारणास्तव माझी बदली...
2023 मध्ये त्रास देण्याच्या चुकीच्या हेतुने माझी बदली करण्यात आली होती. ते पुढे म्हणाले की, माझ्या कुटुंबाने सर्व त्रास सहन केला. न्यायमूर्ती रमना यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंठपीठाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये एका कार्यक्रमादरम्यान आपलं दु:ख व्यक्त केलं. न्यायमूर्ती रमना यावेळी म्हणाले, त्यांना गृहराज्य आंध्रप्रदेशातून मध्य प्रदेशात बदली करण्यात आली होती. कोविडनंतर त्यांची पत्नी गंभीर न्यूरोलॉजिकल आजाराने ग्रस्त आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी, पत्नीची काळजी घेण्यासाठी त्यांनी कर्नाटकात बदली करण्यासाठी विनंती अर्ज केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांच्या अर्जाचं काहीच उत्तर दिलं नाही.
नक्की वाचा - Waqf Act: 'कोर्ट तोपर्यंत हस्तक्षेप करु शकत नाही...'. वक्फ कायद्यावर CJI गवईंचं मोठं वक्तव्य
आता खूप उशीर झालाय..
न्यायमूर्ती रमना म्हणाले, मला त्यांनी पर्याय विचारला होता. मी कर्नाटक निवडलं. कारण मला पत्नीवर NIMHANS मध्ये उपचार करावयाचे होते. मी 1 नोव्हेंबर 2023 मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. यानंतर मी 19 जुलै, 2024 आणि 28 ऑगस्ट 2024 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात निवेदन पाठवले होतं. माझी पत्नी कोविडमुळे मेंदूच्या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. त्यांच्यावरील उपचारांसाठी रमना यांनी सर्वोच्च न्यायालयात निवेदन पाठवले होतं. परंतु त्या निवेदनाचा विचार करण्यात आला नाही किंवा तो नाकारण्यात आला नाही. ते पुढे म्हणाले, विद्यमान सरन्यायाधीश बी.आर. गवई यावर विचार करू शकतात. मात्र मी पद सोडतोय, त्यामुळे आता खूप उशीर झाला आहे.