Love Story: नवऱ्यासमोरच पत्नीने केलं पुतण्यासोबत लग्न! अजब प्रेमाची देशभर चर्चा

आयुषीने तिचा पहिला पती विशालवर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप केला. तिने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे आणि आता तिचा तिच्या आधीच्या पती आणि मुलीशी काहीही संबंध राहणार नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

Bihar News : एका महिलेने तिच्या पुतण्याशी लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी महिलेचा पहिला नवरा देखील तिथे उपस्थित होता. बिहारच्या जमुई सदर पोलीस स्टेशन परिसरातील सिकारिया गावातील आहे.  24 वर्षीय आयुषी कुमारीने तिचा पती विशाल कुमार दुबे आणि मुलीला सोडून तिच्या पतीचा पुतण्या सचिन दुबेशी लग्न केले.

मिळालेल्या माहितीनुसार, आयुषी कुमारीचे पहिले लग्न 2021 मध्ये त्याच गावातील विशाल दुबे याच्याशी झाले होते. लग्नानंतर दोघांना एक मुलगी देखील झाली, जी आता चार वर्षांची आहे. परंतु लग्नाच्या दोन वर्षांनंतर आयुषीची शेजारी आणि नात्यात पुतण्या असलेल्या सचिन दुबेशी जवळीक वाढली लागली. दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली, जी हळूहळू प्रेमात बदलली.

प्रेमात आंधळ्या झालेल्या दोघांनी त्यांच्यातील नातं विसरून नवं नातं प्रस्तापित करण्याचा निर्णय घेतला. १५ जून रोजी आयुषीने तिचा पहिला पती आणि मुलीला सोडून सचिनसोबत घरातून पळ काढला. दोघांनी गावातील शिव मंदिरात डझनभर ग्रामस्थांच्या उपस्थितीत आणि विशाल दुबे याच्यासमोर लग्न केले.

आयुषीने तिचा पहिला पती विशालवर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप केला. तिने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे आणि आता तिचा तिच्या आधीच्या पती आणि मुलीशी काहीही संबंध राहणार नाही. आयुषीने सांगितले की, "मी माझी मुलगी विशालला सोपवली आहे आणि आता मला माझे आयुष्य फक्त सचिनसोबत घालवायचे आहे."

Advertisement

सचिन दुबे यांनेही या लग्नाबद्दल आनंद व्यक्त केला आणि म्हटलं की, आम्ही दोघेही दोन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहोत. आता त्याला एक नाव मिळाले आहे आणि मी आयुषीला आयुष्यभर आनंदी ठेवेन.

आयुषीचा पहिला पती विशाल दुबे याने देखील संपूर्ण प्रकरणात संयमी भूमिका घेत, "जर माझ्या पत्नीचा यातचं आनंद असेल तर मी तिला जाण्यापासून रोखणार नाही. मात्र तिने केलेला छळाचा आरोप खोटा आहे. याउलट माझी पत्नीच मुलीशी आणि आईशी गैरवर्तन करायची." विशालने पुढे सांगितले की, यापूर्वीही आयुषीच्या प्रेमसंबंधाचे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले होते. आजपासून सचिन तिच्यासाठी जबाबदार आहे.

Advertisement