Kangana: 'ड्रग्ज घेणं, दारू पिणं, अनेकांसोबत लैंगिक संबंध, ही तर गटार जनरेशन' GEN-Z ना कंगना हे काय बोलली?

दुसरीकडे, कंगना यांनी पेपर लीक सुधारणा विधेयकाचे समर्थन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

GEN-Z त्या आंदोलनाने केंद्रातील भाजप सरकारला जोरदार हादरा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांना राजीमाना देण्यास भाग पाडलं आहे. या आंदोलनाची चर्चा संपूर्ण जगात होत आहे. शिवाय युवा शक्ती काय आहे हे या आंदोलनाने दाखवले आहे. असे असताना भाजप खासदार आणि कंगना रनौत यांनी मात्र या GEN-Z आंदोलकांबाबत मात्र अतिशय खालच्या दर्जाची टिका केली आहे. तिच्या या टिकेने सोशल मीडियावर मोठं घमासान पाहायला मिळात आहे. कंगनावर जोरदार टिका होत आहे. तिने एक प्रकारे या GEN-Z ना डिवचलं आहे. याला या आंदोलनकर्त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  

जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनादरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि रील्सवर तीव्र शब्द शब्दांत तिने नाराजी व्यक्त केली आहे. या आंदोलनातील तरुणांच्या भाषेवर आणि वर्तनावर प्रश्न उपस्थित करत तिने या पिढीला ‘गटर जनरेशन' असे संबोधले आहे. कंगना रनौत यांनी इंस्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून आपल्या भावना मांडल्या आहेत. 'मी माझ्या संपूर्ण आयुष्यात एकाच ठिकाणी इतके विचित्र आणि अश्लील वर्तन कधीही पाहिलेले नाही. या Gen-Z आंदोलकांची भाषा अत्यंत असभ्य आहे. यांना कोणी जन्म दिला आणि यांचा सांभाळ कसा झाला? असा प्रश्न ही तिने उपस्थित करत आंदोलकांना डिवचले आहे.  

Advertisement

नक्की वाचा - Ambernath News: 12 व्या मजल्यावरून ढकललं, परस्पर दफन करण्याचा ही प्रयत्न, पण तिसऱ्या डोळ्यामुळे गेम खल्लास

पुढे ती म्हणते आपल्या देशाची ओळख संस्कृती आणि शालीनतेसाठी आहे. मात्र हे वर्तन संस्कृतीच्या पूर्णपणे विपरीत आहे. पुढे बोलताना  तिने नमूद केले की, पाश्चात्य संस्कृतीने प्रभावित झालेल्या या मुली अभ्यासात चांगल्या नाहीत. शिवाय त्या भविष्यात चांगल्या गृहिणीही बनू शकत नाहीत. ती ऐवढ्यावरच थांबली नाही ती म्हणते ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टींमधील आपल्या 'स्वातंत्र्याचं' त्या अभिमानानं प्रदर्शन करतात'
या मानसिक त्रासामुळे आपल्याला आता 'डिजिटल डिटॉक्स'ची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नक्की वाचा - Neet Love Story: आंदोलनासाठी गेले लग्न करून परत आले! जंतर-मंतरवरची 'नीट' प्रेम कहाणी, Video होतोय व्हायरल

दुसरीकडे, कंगना यांनी पेपर लीक सुधारणा विधेयकाचे समर्थन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. काँग्रेस खासदार सय्यद नसीर हुसेन यांनी कंगना यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. त्यांना लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची कोणतीही माहिती नाही. तर एमआयएम (AIMIM) नेते वारिस पठाण यांनी कंगना यांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी संपूर्ण Gen-Z पिढीची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.