जाहिरात

Neet Love Story: आंदोलनासाठी गेले लग्न करून परत आले! जंतर-मंतरवरची 'नीट' प्रेम कहाणी, Video होतोय व्हायरल

पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात मोहनचं डोकं फुटलं. तो जखमी झाला. मोहन त्याच ठिकाणी बेशुद्ध पडला.

Neet Love Story: आंदोलनासाठी गेले लग्न करून परत आले! जंतर-मंतरवरची 'नीट' प्रेम कहाणी, Video होतोय व्हायरल

जंतर- मंतरवर झालेलं आंदोलन हे ऐतिहासिक ठरलं. त्याचीच चर्चा संपूर्ण देशात रंगली आहे. या आंदोलनामुळे केंद्रीय मंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांना राजीमाना द्यावा लागला. या आंदोलनासाठी देशभरातून Gen-Z जंतर-मंतरवर आले होते. त्यात मुलांसोबत मुलींची ही मोठ्या प्रमाणात संख्या होती. पण या आंदोलनात असे दोन आंदोलक होते ज्यांनी शांतीत क्रांती केली. हे दोघे आंदोलनासाठी आले. एकमेकांना भेटले. प्रेमात ही पडले आणि थेट लग्न करून घरी  ही परतले. त्यामुळे ही नीट वाली 'नीट' लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.  

एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशीच ही लव्ह स्टोरी म्हणावी लागेल. या लव्ह स्टोरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मोहन श्रीवास्त हा बिहारचा तरुणी आहे. नीट पेपर लिक आंदोलनात सहभागी होण्यासाठी तो बिहारवरून दिल्लीत आला. जंतर-मंतरवर गेला. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यासाठी तो दिल्ली आला होता. त्यावेळी जंतर मंतरवर काही खाण्याची व्यवस्था नव्हती. त्यावेळी एक तरुणी त्याच्याकडे आली आणि त्याला खाण्यासाठी दिलं. ती सतत मोहनकडे येत होती आणि काही ना काही त्याला खाण्यासाठी देत होती. 

नक्की वाचा - Uddhav Thackeray: विष्णूचा आवतार ते अमित शाहंचा राजीनामा!, उद्धव ठाकरेंच्या खणखणीत मुलाखतीत दणदणीत फटकारे

ही सिलसिला सुरूच होता. त्यावर मोहन तिला म्हणाल फक्त खाण्यासाठी देणार आहे की पिण्यासाठी पाणी देणार आहे. त्यावर ही तरूणी दुसऱ्या दिवशी त्याला पाणी ही घेवून आली. त्यानंतर या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्यांच्या गप्पा ही झाल्या. विशेष म्हणजे या तरुणीने नीटची परिक्षा दिली होती. पेपर लिक झाल्यामुळे ती ही या आंदोलनात सहभागी झाली होती. ती दिल्लीचीच रहिवाशी आहे. मात्र त्यानंतर एक ट्वीस्ट आला. पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात मोहनचं डोकं फुटलं. तो जखमी झाला. मोहन त्याच ठिकाणी बेशुद्ध पडला. 

नक्की वाचा - Education Minister: प्रधान गेले जोशी आले! नव्या शिक्षण मंत्र्यांना पगार किती? काय मिळतात सरकारी सुविधा?

त्यावेळी मोहनच्या मदतीला हीच तरुणी पुढे आली. तिने त्याला एका रुग्णालयात दाखल केले. ज्या वेळी मोहन शुद्धीवर आला त्यावेळी ती तरुणी तिथेच होती. तिने त्याला पकडून मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही असं सांगितलं. त्यावर मोहन याने ही मी तुझ्यावर प्रेम करत होतो. पण सांगण्यासाठी भित होतो असं त्यांने सांगितलं. प्रेमाची कबुली एकमेकांनी दिली होती. पण आता करायचे काय असा प्रश्न होता. दोघांनी ही वेळ न घालवता मंदिरात जावून लग्न केलं. त्यानंतर मोहन तिला घेवून बिहारला आला. घरातून जाताना तो धर्मेंद्र प्रधानांचा राजीमाना घेण्यासाठी निघाला होता,  मात्र परत येताना तो घरी नवरी घेवून आला. जेन-झींच्याच काळात असं होवू शकतं. या लव्ह स्टोरीचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com