कारगिल @ 25 : सोनूला सांगा PCM चे कोचिंग घे, हुतात्मा मनोज पांडेंचं शेवटचं पत्र वाचून येईल डोळ्यात पाणी

Kargil @ 25 : तुम्ही काळजी करु नका. आमची परिस्थिती शत्रूपेक्षा चांगली आहे. पण, त्यांना पळवून लावायला किमान एक महिना वेळ लागेल. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या एका सैनिकाचं हे शेवटचं पत्र आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
कारगिल युद्धातील हुतात्मा सैनिकाचं शेवटचं पत्र
मुंबई:

Kargil @ 25 : तुम्ही काळजी करु नका. आमची परिस्थिती शत्रूपेक्षा चांगली आहे. पण, त्यांना पळवून लावायला किमान एक महिना वेळ लागेल. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या एका सैनिकाचं हे शेवटचं पत्र आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या कारगिल युद्धाला आता 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. या युद्धात 527 भारतीय जवान हुतात्मा झाले. हुतात्मा होण्यापूर्वी भयंकर गोळीबारामध्ये सैनिकांनी त्यांच्या कुटुंबीयांना जी पत्र लिहिली आहेत ती आता अमर झाली आहेत. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

यापैकी अनेक पत्र ते हुतात्मा झाल्यानंतर त्यांच्या घरांच्या मिळाली. आपल्या जवानांना रणभूमीवर ही पत्रं मोठा आधार होता. कारगिल, बटालिक, द्रासमधील सैन्याच्या पोस्टल सर्विस कोरनं म्यूल मेल म्हणजे खच्चरच्या मदतीनं सैनिकांना त्यांच्या घरातील पत्र पोहचवली होती. कारगिल युद्धातील हुतात्मा मनोज पांडे यांनी त्यांच्या घरी पत्र पाठवलं होतं. कारगिल युद्धाला यंदा 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं NDTV विशेष सीरिजमधून या हुतात्मांच्या आठवणी तुम्हाला सांगणार आहे.

मनोज पांडे यांनी सैन्यात भर्ती व्हावं अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा नव्हती. पण, मुलाची इच्छा पाहून त्यांनी परवानगी दिली. मनोजच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांच्या वडिलांची पान टपरी आहे. 

( नक्की वाचा : पाचवीत एकाच बाकावर, NDA मध्येही एकत्र; देशाचे लष्कर अन् नौदल प्रमुखांची अनोखी कहाणी )
 

मनोज यांनी जुन्या पुस्तकांच्या मदतीनं त्यांचा अभ्यास केला. एनडीएमध्ये प्रवेश घेण्यासाठी देखील त्यांनी सेकंड हँड पुस्तकं वापरली. त्यानंतरही त्यांनी कोणत्याही खासगी कंपनीमध्ये न जाता सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. मनोज यांनी देशाबद्दल असलेल्या प्रेमापोटीच सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा गूण त्यांच्या लहान भावांमध्येही दिसतो. 

Advertisement

मनोजच्या वडिलांनी सांगितलं की, 'आम्ही शिकलेलो नाहीत. पण, आम्ही मुलाला शिक्षण दिलं होतं. तो खूप समजूतदार होता. त्यामुळे त्यानं घेतलेला निर्णय आम्ही मान्य करत असू.'

मनोज पांडे यांनी कारगिलमध्ये दाखवलेल्या शौर्याबद्दल सारा देश त्यांना आजही वंदन करतं. युद्धभूमीवर पाकिस्तानी सैन्याशी दोन हात करताना त्यांनी शेवटचं पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये ते लिहितात, 'आत्याची तब्येत चांगली आहे, हे समजल्यानंतर खूप आनंद झाला. तुम्ही काळजी करु नका. आमची पोझिशन शत्रूपेक्षा चांगली आहे. पण, त्यांना पळवून लावायला किमान एक महिना लागेल. सोनूला सांगा PCM चं कोचिंग घे. त्याचबरोबबर लखनौ विद्यापीठात B.Sc साठी प्रवेश घेण्याचा नक्की प्रयत्न कर. 

Advertisement

कारगिल युद्ध : भारतीय जवानांच्या शौर्याची साक्ष

कारगिल युद्धाला ऑपरेशन विजय  (Operation Vijay) म्हणूनही ओळखलं जातं. भारत आणि पाकिस्तान यांच्या मे ते जुलै 1999 दरम्यान काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात हे युद्ध झालंय. या युद्धात भारतीय सैन्यानं हळू-हळू पण पूर्णपणे पाकिस्तानी सैन्याला उंचावरील शिखरांवरुन पळवून लावलं. 26 जुलै 1999 रोजी हे युद्ध समाप्त झालं. त्या दिवशी भारतानं पाकिस्तानच्या ताब्यातील सर्व परिसर पुन्हा मिळवला. 

या युद्धानं भारतीय सैन्याची क्षमता आणि दृढ संकल्पाचं संपूर्ण जगाला दर्शन झालं. यामध्ये आपले अनेक वीर हुतात्मा झाले. त्यांचा लढा आणि हौतात्म्याचं स्मरण म्हणून दरवर्षी 26 जुलै हा विजय दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. 
 

Advertisement