जाहिरात
This Article is From Jul 01, 2024

पाचवीत एकाच बाकावर, NDA मध्येही एकत्र; देशाचे लष्कर अन् नौदल प्रमुखांची अनोखी कहाणी

देशात पहिल्यांदाच देशाचे लष्कर आणि नौदल प्रमुख एका राज्यातील, एका शहरातील, एका शाळेतीलच नाही तर एकाच वर्गातील आहे.

पाचवीत एकाच बाकावर, NDA मध्येही एकत्र; देशाचे लष्कर अन् नौदल प्रमुखांची अनोखी कहाणी
नवी दिल्ली:

जनरल उपेंद्र द्विवेदी यांची देशाच्या लष्कर प्रमुखाचा पदभार स्वीकारला आहे. देशाचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्यासोबत  आपल्या नव्या लष्करप्रमुखांचं खास कनेक्शन आहे. लष्करप्रमुख आणि नौदलप्रमुखांची अशी कहाणी ज्याबद्दल क्वचितच तुम्हाला माहिती असेल. 

देशात पहिल्यांदाच देशाचे लष्कर आणि नौदल प्रमुख एका राज्यातील, एका शहरातील, एका शाळेतीलच नाही तर एकाच वर्गातील आहे. विशेष म्हणजे दोघेही शाळेत एकाच बाकावर बसत होते. जनरल उपेंद्र द्विवेदी आणि अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी या दोघांनीही मध्य प्रदेशातील रीवा सैनिक शाळेतून शिक्षण घेतलं. त्यांची कहाणी एखाद्या दोन भावांसारखी आहे. दोघेही पाचव्या वर्गापासून मित्र आहेत. एनडीएसारखी कठीण परीक्षा त्यांनी एकत्रितच दिली होती. मध्यप्रदेशाच्या रीवा सैनिक शाळेतून आतापर्यंत 700 हून अधिक सैन्य अधिकारी तयार झाले आहेत. ज्यात तब्बल 25 जनरल रँकचे आहेत. ज्यातील दोन आता चार स्टार सेवेचे प्रमुख आहेत. 

नक्की वाचा - लडाखमध्ये नदी ओलांडताना लष्कराच्या टँकचा अपघात, 5 जवान शहीद

शाळेत कसे होते लष्करप्रमुख?
रीवा सैनिक शाळेचे दोन्ही विद्यार्थी देशाची सेवा करीत आहेत. यामुळे मध्यप्रदेशाला याचा अभिमान आहे. रीवा सैनिक शाळेचे वरिष्ठ शिक्षक डॉ. आरएस पांडे यांनी सांगितलं की, भारतीय सशस्त्र दलातील दोन्ही सैन्याचे प्रमुख वर्गमित्र आहेत. ही बाब शाळेसह राज्यासाठीही अभिमानाची बाब आहे. 30 जून रोजी लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी कार्यभार सांभाळला. त्यादरम्या रीवा सैनिक शाळेच्या मुख्याध्यापकानांही या सोहळ्यात सामील होण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. लष्करप्रमुखाचे अनेक वर्गमित्र यावेळी उपस्थित होते. 

केवळ वर्गमित्रच नाही तर...
लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र त्रिपाठी यांच्या पदग्रहण सोहळ्यात उपस्थित राहिलेले त्यांचे वर्गमित्र प्राध्यापक अमित तिवारी यावेळी म्हणाले, आमची बॅच एका कुटुंबासारखी होती. आमच्यापैकी १८ जणं इथं आले आहेत. आमचे वर्गमित्र, सखा जनरल उपेंद्र द्विदेशी यांची देशाच्या लष्करप्रमुख पदावर नियुक्ती झाली आहे. 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com