Viral Video: नाद केला! नवी कार घ्यायला हेलिकॉप्टरने एन्ट्री; कोण आहे हा उद्योजक? पाहा VIDEO

Kerala Businessman Poland Moosa Viral Video: कारची डिलिव्हरी घेण्यासाठी ते चक्क हेलिकॉप्टरने पोहोचले. यावेळी त्यांनी खास व्हिडिओही शूट केला, ज्याची सध्या माध्यमांमध्ये तुफान चर्चा होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Kerala Businessman Viral Video: नवीन कार खरेदी करण्याचा आनंद काही औरच असतो. शोरुममधून नवी कार आणण्यासाठी आपण जुन्या गाडीतून, रिक्षाने किंवा इतर काही वाहनांने जातो. पण सध्या एका अवलियाने नवी कार आणण्यासाठी अशी काही जबरदस्त एन्ट्री केली आहे जी पाहून तुम्हीही थक्क व्हाल. केरळमधील एका उद्योजकाने नवी कार खरेदी करण्यासाठी शोरुमला जायला चक्क हेलिकॉप्टर वापरले. या महागड्या डिलीव्हरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

केरळमधील उद्योजकाने आपली नवी कार आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरने जबरदस्त एन्ट्री केली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. केरळमधील फ्रॅग्रन्स वर्ल्डचे मालक पोलंड मूसा असे या हौशी व्यक्तीचे नाव असून  त्यांना मुसा हाजी म्हणूनही ओळखले जाते. त्यांची स्वतःची परफ्यूम कंपनी आहे, ज्याची जगातील 132 देशांमध्ये 4,000 हून अधिक परफ्यूम उत्पादने विकली जातात.या वर्षी मे महिन्यात  त्यांनी नवीन बेंटले बेंटलेगा लक्झरी एसयूव्ही कार खरेदी केली. या कारची डिलिव्हरी घेण्यासाठी ते चक्क हेलिकॉप्टरने पोहोचले. यावेळी त्यांनी खास व्हिडिओही शूट केला, ज्याची सध्या माध्यमांमध्ये तुफान चर्चा होत आहे. 

Advertisement

इतकेच नव्हेतर मूसा यांनी या कारची खरेदी केल्यानंतर त्यांच्या पाठीमागे दिसणारा जुन्या गाड्यांचा ताफाही त्यांची श्रीमंती दाखवतो. या व्हिडिओमध्ये  एक रेंज रोव्हर, एक लँड रोव्हर डिफेंडर 110 आणि एक टोयोटा लँड क्रूझर दिसत आहे. इतकेच नव्हेतर त्यांच्याकडे एक पांढरी रोल्स रॉयस कलिनन एसयूव्ही, G63 AMG, लेक्सस LX600 सारख्या इतर अनेक गाड्या आहेत. यापैकी बहुतेक गाड्या दुबईमध्ये आहेत कारण त्याचा व्यवसाय बहुतेक येथे पसरलेला आहे. 

Advertisement

कारची किंमत किती?
मूसा यांनी खरेदी केलेली ही कार बेंटले बेंटायगा ईडब्ल्यूबी आहे, जी एक सुपर लक्झरी एसयूव्ही आहे. कारची डिलिव्हरी घेण्यासाठी मुसा स्वतः हेलिकॉप्टरने पोहोचला होता, ज्याचे दृश्य एखाद्या चित्रपटाच्या दृश्यापेक्षा कमी नव्हते. जर आपण या कारच्या किंमतीबद्दल बोललो तर ती 6 कोटी रुपयांपासून सुरू होते जी व्हेरिएंटनुसार बदलते. दरम्यान, या साऊथ स्टाईल डॅशिंग उद्योजकाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Godavari River : तेलंगणाच्या सीमेवरील धरणात सहा मुलं बुडाली, नदीच्या किनाऱ्यावर कुटुंबीयांचा आक्रोश