
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणाच्या हद्दीतील मेडीगड्डा धरणाजवळ गोदावरी नदीच्या पात्रात सहा मुलं बुडाली आहेत. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरून गोदावरी नदी वाहते. दोन राज्यांच्या सीमारेषेवरून वाहणाऱ्या या नदीच्या पलीकडे, तेलंगणाच्या हद्दीत असलेल्या मेडीगड्डा धरणाजवळ संध्याकाळच्या सुमारास आठ मुलं आंघोळीसाठी गेली होती.
त्यातील सहा मुलं नदीच्या पात्रात बुडाले. संध्याकाळपासून सुरू असलेली शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अद्याप त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. तेलंगणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम राबवत आहेत. घटनेमुळे नदीच्या किनाऱ्यावर कुटुंबीयांचा आक्रोश सुरू असून परिसरात शोककळा पसरली आहे.
नक्की वाचा - Bengaluru Stampede : 'मलाही इथेच राहायचं आहे', चेंगराचेंगरीत मुलाला गमावलेल्या पित्याने मारली कबरीला मिठी
बुडालेल्या मुलांची नावं...
पत्ती मधुसूदन - 15
पत्ती मनोज - 13
कर्नाळा सागर - 14
तोगरी रक्षित - 11
पांडू - 18
राहुल - 19
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world